गणेश पाटील याचा मृतदेह इन कॅमेरा बाहेर काढण्यात आला.  
जळगाव

Jalgaon Crime | गणेशच्या मृत्‍यूचे गूढ अडीच महिन्यानंतर उकलणार, न्यायासाठी वडिलांनी झिजवले पोलिस ठाण्याचे उंबरठे!

१५ मार्च रोजी क्रिकेट खेळताना संशयास्पद मृत्यू,

पुढारी वृत्तसेवा

जळगावः अखेर अडीच महिन्यांनंतर गणेशचा जमिनीत पुरलेला मृतदेह जमिनीतून काढला बाहेर काढण्यात आले असून मृत्यूचे गूढ उलगडणार आहे. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील रेल गावातील १२ वर्षीय गणेश नवल पाटील याचा १५ मार्च रोजी क्रिकेट खेळताना संशयास्पद मृत्यू झाला होता ! जुन्या वादातून मित्राने छातीत बॅट मारून खून केल्याचा वडील नवल पाटील यांचा आरोप केला आहे.

न्यायासाठी वडिलांची दीड महिन्यांहून अधिक काळ पोलीस ठाणे ते एसपी कार्यालयापर्यंत सुरू होती धावपळ सुरू होती. फॉरेन्सिक पथक, पोलिस व तहसीलदारांच्या उपस्थितीत अडीच महिन्यांनंतर पुरलेला मृतदेह जमिनीतून बाहेर काढण्यात आला !

मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना करण्यात आला एकुलत्या एक मुलाचा सांगाडा पाहून वडील नवल पाटील यांना अश्रू अनावर झाले जळगावच्या धरणगाव तालुक्यातील रेल गावातील १२ वर्षीय गणेश नवल पाटील यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात आज अत्यंत महत्त्वाची घडामोड घडली.

मुलाचा मृत्यू अकस्मात नसून त्यामागे घातपात असल्याची शक्यता वडील नवल पाटील यांनी व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा नव्याने तपास सुरू केला असून, त्यानुसार आज फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक, पोलिस अधिकारी आणि धरणगावचे तहसीलदार यांच्या उपस्थितीत गावाजवळील नदीकाठी पुरण्यात आलेला गणेश नवल पाटील याचा मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढण्यात आला.

संपूर्ण प्रक्रिया प्रशासनाच्या देखरेखीखाली इन कॅमेरा पार पडली. दरम्यान आपल्या एकुलता एक मुलाचा मृतदेहाचा सांगाडा पाहून वडील नवल पाटील यांना अश्रू अनावर झाले होते. यानंतर मृतदेह पुढील तपासणी व शवविच्छेदनासाठी धुळे येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे. आता शवविच्छेदन अहवालातून गणेशच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार असून, या प्रकरणामागील सत्य काय आहे?, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT