जळगाव

Jalgaon Crime : मेलाणे गावात मका पिकाच्या आडून गांज्याची शेती, पोलिसांच्या छाप्यात 44 लाखांची झाडे जप्त

गणेश सोनवणे

जळगांव : पुढारी वृत्तसेवा – चोपडा तालुक्यातील मेलाणे गावात मक्याच्या शेतामध्ये गांजाची पेरणी केली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यात ४४ लाख १० हजार रुपयाचे ९८० किलो गांजाची हिरवे ओली झाडे जप्त केली. आरोपी अर्जुन सुमाऱ्या पावरा वय ४५ रा. मेलाणे ता. चोपडा यास ताब्यात घेवून गुन्हयांत अटक केली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 12 रोजी पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की, चोपडा तालुक्यातील मेलाणे गावात राहणारा अर्जुन सुमान्ऱ्या पावरा याने त्याच्या शासनाकडून उपजिविकेसाठी मिळालेल्या शेतात मका पिकाच्या आडून गांजाची शेती करत असल्याचे कळले. त्यासंदर्भात खात्री करण्यासाठी दोन स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवण्यात आले. खात्री झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वरी यांना माहिती देण्यात आली. त्यांनी केलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, चोपडा डॉ. कृणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक, चोपडा ग्रामीण कावेरी कमलाकर, वनविभागाचे अधिकारी कमल ठेकले, नायब तलसिलदार रविंद्र महाजन, फोटोग्राफर, वजनकाटा धारक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अमोल मोरे, सहा. पोलीस निरीक्षक, सफो/युनूस शेख, पोहेकॉ सुनिल दामोदरे, संदिप पाटील, गोरख बागुल, प्रविण मांडोळे, नंदलाल पाटील, दर्शन ढाकणे, अशोक पाटील, बबन पाटील, मपोहेकॉ रजनी माळी, मपोना उपाली खरे या पथकाने मेलाणे गावात आरोपी अर्जुन सुमाऱ्या पावरा याच्या शेतात जावून गांज्याच्या शेतीचा पर्दाफाश केला.

गांजाचे झाडे उपटून त्याचे वजन केलेअसता ९८० किलो भरले. ४४ लाख १० हजार रुपयांची गांजाची हिरवीओली झाडे जप्त केली. आरोपी अर्जुन सुमाऱ्या पावरा वय ४५ रा. मेलाणे ता. चोपडा यास ताब्यात घेवून गुन्हयांत अटक केली आहे. सदर बाबत चोपडा ग्रामीण पो.स्टे.ला CCTNS नं.४०/२०२४ NDPS कायदा १९८५ चे कलम २०,२२ प्रमाणे गुन्हा दाखल केला. पुढील तपास .सहा. पोलीस निरीक्षक, नितनवरे, हे करीत आहेत.

SCROLL FOR NEXT