सीआयडी ऑफिसर असल्याचे सांगून अडकवले हनीट्रॅपच्या जाळ्यात  file photo
जळगाव

Jalgaon | सीआयडी ऑफिसर असल्याचे सांगून अडकवले हनीट्रॅपच्या जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : महिलेने सीआयडी ऑफिसर असल्याचे सांगून एका व्यावसायिकाला शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर महिलेने व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकविण्याची धमकी देत त्यांच्याकडून खंडणी वसुल केली. व्यवसायिकासह त्याच्या पत्नीला मारहाण करीत ४० ग्रॅम सोन्याची चैन व मगळसूत्र जबरदस्तीने काढून नेले.

ही हनीट्रॅपची घटना दि. ९ उघडकीस आल्यानंतर रामानंद नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महिलेला अटक केली असून तीला न्यायालयाने दि. १५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

शहरातील एका उच्चभ्रू परिसरात वास्तव्यास असलेल्या व्यावसायिकाची सोशल मीडियावरील डेटींग अॅपवर या महिलेची ओळख झाली. त्या महिलेने सीआयडीसी ऑफिसर असल्याचे सांगून पती रेल्वेत टी.सी असल्याचे सांगितले. त्या महिलेचा पती तिच्यासोबत दोन वर्षांपासून शारिरीक संबंध ठेवत नसल्याने ७ मार्च रोजी ते धुळे येथे भेटले. याठिकाणी त्या महिलेने व्यावसायिकाला जेवणात गुंगीचे औषध देत त्यांना एका फ्लॅटवर घेवून गेली. तेथे व्यावसायिकाचे नको त्या अवस्थेत फोटो काढून तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. मूळची मुक्ताई नगर येथील ती हनी ट्रॅपमध्ये अडकविणारी महिला सद्या रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या महिलेला शुक्रवारी अटक केली. त्या महिलेला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने महिलेस १५ जुलै पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT