जळगांव : पुढारी वृत्तसेवा - रावेर तालुक्यातील निंभोरा हद्दी मधून दोन गुन्ह्यांमधील म्हशींचा तपास करीत असताना पोलिसांनी तांत्रिक मदतीच्या आधारे 11 म्हशींसह सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल, पाच संशयित आरोपी व एकूण दहा गुन्हे उघडकीस आणले अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये एप्रिल महिन्याच्या 24 तारखेला दोन गुन्हे दाखल झाले होते. यामध्ये दोन गुन्ह्यांमध्ये पाच म्हशी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या होत्या. या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहा पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी जनावरे चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या या सूचनानुसार निंभोरा पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सपोनि हरीदास बोचरे व तपासी अंमलदार पोहेका / ज्ञानेश्वर चौधरी, अविनाश पाटील हे गुन्ह्याचा तपास करीत होते. दाखल गुन्ह्यात सपोनि बोचरे यांनी 60 पेक्षा अधिक सि.सि.टी.व्ही कॅमे-यांची पडताळणी केली. सदरील आरोपी हे मध्यप्रदेश राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले. यातील ब-हाणपुर जिल्ह्यातील बोरी येथे राहणारा तुकाराम रुमालसिग बा हा यावल तालुक्यातील न्हावी या गावी राहत असल्याची माहिती मिळाली. सपोनि हरिदास बोचरे यांना प्राप्त झाली.
त्यांनी लागलीच फैजपुर पो. स्टे. चे सपोनि निलेश वाघ यांना माहीती देवून आरोपी तुकाराम रुमालसिग बारेला याला ताब्यात घेतले. आरोपी तुकाराम याच्याकडे तपास केले असता इतर आरोपी मध्य प्रदेश राज्यात असले बाबत समजले. पोलीस अधिक्षक यांच्या आदेशाने सपोनि हरिदास बोचरे, पोहेकॉ जाकीर पिंजारी, पोहेकॉ योगेश चौधरी, पोना सुरेश पवार व पोकों मयुर निकम व रावेर पो. स्टे. चे. पोहेकॉ ईश्वर चव्हाण, पोकों सचिन घुगे असे शोध पथक मध्यप्रदेश राज्यात जावून आरोपी धर्मेंद्र दुरसिंग बारेला, रा.ढेरीया जि. खंडवा, शांताराम बिल्लरसिंह बारेला, रा. हिवरा जि.ब-हाणपुर, सुभाष प्रताप निंगवाल, रा. दहिनाला जि.ब-हाणपुर, मस्तरीराम काशीराम बारेला, रा.न्हावी ता. रावेर यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडुन म्हशी, 2 बोलेरो पिकअप व 2 मोटार सायकल असे एकुण 16 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला .
या गुन्हाच्या अनषंगाने चौकशी केली असता त्यांनी निंभोरा पो स्टे येथील गु.र.न 69/2024, गु.र.न 108/2024, फैजपुर पो स्टे गु.र.न 97/2024, गु.र.न 137/2024, गु.र.न 151/2024 मुक्ताईनगर पो स्टे गु.र.न 05/2024, गु.र.न 57/2024, रावेर पो स्टे गु.र.न 298/2024, सिल्लोड ग्रामीण पो स्टे (जि. छत्रपती संभाजीनगर) गु.र.न 165/2024 व पंधाना पो स्टे गु.र.न 122/2024 (जि. खंडवा, राज्य- मध्यप्रदेश) अशा ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे.
यातील संशयित आरोपी धर्मेंद्र दुरसिंग बारेला, रा. ढेरीया जि. खंडवा यावर विविध कायदे व कलमान्वये 14 गुन्हे मध्यप्रदेश राज्यात दाखल असून तो पंधाना पोलीस स्टेशनचा जि. खंडवा येथील हिस्ट्रीशीटर आहे. मध्यप्रदेश राज्यातील ब-हाणपुर, खंडवा, खरगोन, हरदा या 4 जिल्हातुन तडीपार करण्यात आले आहे. सदरची कारवाई ही निंभोरा पो स्टे प्रभारी अधिकारी सपोनि हरीदास बोचरे, पोउपनि राजेंद्र पाटील, सफौ ज्ञानेश्वर पाटील, अशरफ शेख, स्वप्निल पाटील, सुरेश अढायगे, सुरेश पवार, मयुर निकम, किरण जाधव व अमोल वाघ फैजपुर पो स्टे प्रभारी अधिकारी सपोनि निलेश वाघ, सफौ/विजय चौधरी, सफौ/देविदास सुरदास, राजेश ब-हाटे, महेंद्र महाजन, रावेर पो स्टे पोहेकॉ ईश्वर चव्हाण, सचिन घुगे, स्था. गु. शाखा जळगाव पोना/ईश्वर पाटील, मिलींद जाधव, गौरव पाटील या तांत्रिक विश्लेषण पथकाने सि.सि.टी. व्ही फुटेज व इतर पुरावे गोळा करुन एकुण 10 गुन्हे उघडकीस आणले आहे.