Murder Case Pudhari
जळगाव

Bhusawal crime news : भुसावळ शहर पुन्हा हादरले! 'ऑन ड्यूटी' कर्मचाऱ्याचा खून

या प्रकरणी आरोपी आकाश गोरखा यास शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

पुढारी वृत्तसेवा

जळगांव : शहरातील मध्य रेल्वे या जलशुद्धीकरण केंद्रात 'ऑन ड्यूटी' असलेल्या प्रसाद यशवंत कुलकर्णी (५८, रा. स्टार वळ, भुसावळ) या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या डोक्यात लोखंडी पट्टी त्यांचा खून करण्यात आला. ही शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आकाश गोरखा यास शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शहरातील रेल्वे परीसरात असलेल्या कालिंका माता मंदिराजवळ २८ जून रोजी संतोष रघुवीर मनचल (५३) भंगार चोरीच्या वादातून खून झाला होता. तर प्रसाद यशवंत कुलकर्णी हे शनिवारी दुपारी ४ ते २ १२ या शिफ्टमध्ये कर्तव्यावर असताना शनिवारी नऊ वाजेच्या सुमारास कार्यालयात असताना संशयित लोखंडी पट्टीने त्यांच्या डोक्यावर जोर वार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आणि अतिरक्तस्राव झाल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी शहर पोलीस स्टेशन मध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. आरोपी आकाश भानुदास गोरखा ( रा. कवाडे नगर, भुसावळ) हा मनोरुग्ण असून ठाणे येथे त्याची ट्रीटमेंट सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या अरोपींवर २ पूर्वीचे गुन्हे आहेत . २०२१ पासून आजपर्यंत त्याचे विरुद्ध कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नव्हता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT