शस्त्राचा धाक दाखवून बकऱ्या चोरणारी टोळी गडाआड Pudhari Photo
जळगाव

Jalgaon Crime | शस्त्राचा धाक दाखवून बकऱ्या चोरणारी टोळी गडाआड

१ लाख ३५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

जळगांव :धारदार शस्त्राचा धाक दाखवून १९ बोकड व ७ बकऱ्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून त्यांच्याकडून १ लाख ३५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील हिंगोणे गावातील एका झोपडीच्या ठिकाणी टोळीने धारदार शस्त्राचा धाक दाखवत १९ बोकड व ७ बकऱ्या चारचाकी वाहनात टाकून चोरी केल्याची घटना घडली होती. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान ही चोरी चाळीसगाव तालुक्यातील भवाळी गावातील चेतन गायकवाड यांनी केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

पथकाने भवाळी गावात जाऊन चेतन गायकवाड व त्यांचे साथीदार यांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही चोरी चेतन गायकवाड यांच्यासह त्याचे साथीदार गोरख फकीरा गायकवाड, बबलू आबा जाधव, गोरख सुरेश गोकुळ, सोमनाथ भिकन गायकवाड, गोकुळ गायकवाड आणि शंकर मोरे सर्व रा.भवानी ता. चाळीसगाव यांच्या सोबत केल्याचे सांगितले. यातील गोकुळ गायकवाड आणि शंकर मोरे हे दोघे पसार झाले. उर्वरित पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि रोकड असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, दत्तात्रय पोटे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पाटील, हिरालाल पाटील, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, महेश पाटील, सागर पाटील, ईश्वर पाटील, दीपक चौधरी यांनी केली आहे. अटकेतील पाचही जणांना पुढील चौकशीसाठी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT