जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात विविध योजनांचा व विकासकामांचा आढावा घेताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद. Pudhari News network
जळगाव

जळगाव : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला विविध योजना, विकासकामांचा आढावा

निवडणुकीतून मुक्त होताच जिल्हा प्रशासन लागले कामाला

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जिल्हा प्रशासन नुकतेच विधानसभा निवडणुकीच्या कामातून मुक्त झाले. जळगाव जिल्ह्यात शुक्रवार (दि.29) राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा व विकासकामांचा आढावा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात घेतला. त्यात ‘दिशा ‘ (जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती) समितीच्या विषयाशी निगडित बाबी अंतर्भूत होत्या.

याप्रसंगी सर्व विकास कामांचा संबधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेवून सर्व प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सुचना संबधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. यावेळी ज्या यंत्रणाकडे कामे प्रलंबित आहेत, त्यांना संपर्क साधून अडचणी सोडवण्यात आल्या.

रेल्वेचे विविध ठिकाणचे प्रलंबित पूल, त्याला निगडित सार्वजनिक बांधकाम, भूसंपादन, क्रिडा, परिवहन, नगर विकास, वन, मुद्रांक शुल्क, नगर रचना, GSDA, ग्रामीण विकास, जलसंपादन, शिक्षण विभाग, क्रिडा, जिल्हा उद्योक केंद्र, सहकार, कौशल्य विकास, नगरविकास, तहसिलदार संबधित प्रकरणे, पुर्नवसन, MIDC इत्यादी सर्व विभागातील प्रलंबित विकास कामांची व योजनांचा पाठपुरावा करण्यात आला.

विशेषतः रेल्वेसाठी करावयाचे जमिन संपादन, महामार्ग आणि जलसंपदासाठी प्रलंबित भूसंपादन या विषयावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. राष्ट्रीय महामार्गाचा विषय अत्यंत महत्वाचा असल्याचे सांगून हे काम युद्ध पातळीवर करण्यासाठी आपण स्वतः जिथे अडथळा असेल तिथे हजर असल्याचे सांगून कामे सुरु आहेत पण त्याचा वेग वाढविण्याची सूचना राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेला जिल्हाधिकारी यांनी दिले.

या सोबतच जलसंपदा आणि इतर विभागातील सर्व प्रलंबित कामे योग्य समन्वय साधत त्वरित पुर्ण कराव्यात अशा सुचना बैठकीत जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. याप्रसंगी ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक राजू लोखंडे, पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी जयश्री माळी, पुनर्वसन विभागाचे दुसरे उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT