जळगाव : मुख्यमंत्री शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शाळांचा गौरव जिल्हा नियोजन समिती सभागृहात करण्यात आला. या समारंभात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त शाळांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाप्रसंगी वस्त्रोद्योग मंत्री तथा आमदार संजय सावकारे, आमदार किशोर पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, माजी महापौर सीमा भोळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, शिक्षणाधिकारी विलास पाटील व कल्पना चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
भाजपाचे संजय सावकारे आणि किशोर पाटील हे उपस्थित होते. भाजपाचे इतर कोणतेही आमदार अथवा खासदार कार्यक्रमाला हजर राहू शकले नाहीत तर पालकमंत्री नाशिक येथे अन्य कार्यक्रमात व्यग्र असल्याने उपस्थित नव्हते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे प्रशिक्षणासाठी बाहेरगावी असल्यामुळे ते देखील अनुपस्थित होते. नामदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीनंतर बक्षीस वितरणास प्रारंभ करण्यात आला.