जळगाव : भुसावळ येथील सेंट अलॉयसियस हायस्कूल या ठिकाणी 11 सप्टेंबर रोजी नववीतील स्काऊट गाईड विद्यार्थ्यांना सद्भावना दिनानिमित्त रॅलीच्या नावाखाली धार्मिक स्थळी नेण्यात आले. मात्र या ठिकाणी धार्मिक भावना दुखावणारी कृती करण्यास लावल्याची पालकांची तक्रार व संघटनेने केली. या प्रकरणी तीन महिन्यानंतर शहर पोलीस स्टेशन भुसावळ या ठिकाणी प्रभारी गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांच्या फिर्यादीवरून मुख्याध्यापिकेसह शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
मिळालेल्या माहितीनुसार भुसावळ येथील सेंट अलॉयसियस हायस्कूल सद्भावना दिनानिमित्त सर्व धर्म भाव अशी 11 सप्टेंबर 2025 रोजी नववीतील स्काऊट अँड गाईड विद्यार्थ्यांना रॅलीच्या नावाखाली धार्मिक स्थळी नेण्यात आले. या ठिकाणी भावना दुखवणारी कृती करायला सांगितल्याची पालकांची तक्रार व संघटनांनी केली. याबाबत संघटनांनी आंदोलन ही केले होते. तीन महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून प्रभारी गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांच्या फिर्यादीवरून मुख्याध्यापिका शीला सायमन उपशिक्षक अमोल दादळे, शेख इरफान, बर्नार्ड मॉरीस, मिशेल फर्नांडिस शिक्षण सेविका आफरीन खान, कैलिन कर आणि संगणक शिक्षक गुरुजीत सिंग पदम यांच्यावर बी एन एस कलम (2023) 299 व 3 (5) अन्वये म्हणजे धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिक्षण विभागाने मुख्याध्यापिका शीला सायमन मान्यताप्राप्त उपशिक्षक अमोल दंदाळे शेख इरफान शेख मुस्ताक शेख, बनाई एस मॉरिस, मिशेल फर्नांडिस यांची निलंबन करून अहवाल सादर करण्याचे आदेश द सोसायटी ऑफ द अवर लेडी ऑफ फातेमा संचलित सेंट अलायसेस हायस्कूलचे अध्यक्ष न दिले होते या आदेशाला केवळ अमोल दंदाळे व शेख इरफान या शिक्षकांवर तात्पुरती निलंबनाची कारवाई झाली होती.
या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनेने मोर्चा काढून तक्रार दिली, भाजपाचे राज्य परिषद सदस्य प्रमोद सावकारी राष्ट्रीय स्वयं संघाचे समितीत सुराणा यांनी तक्रार केली होती. नंतर माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी प्राथमिक उपशिक्षणाधिकारी व्हि. डी. सरोदे जिल्हा स्काऊट व गाईड कार्यालयाच्या जिल्हा संघटक वैशाली आवठळे व भुसावळ गटशिक्षणाधिकारी किशोरवयीनकडे यांची त्री सदस्य चौक नेमली. या समितीने 26 सप्टेंबर रोजी अहवाल दिला होता त्यानंतर ही नोटीस देऊनही गांभीर्य न दिसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले
सद्भावना दिनानिमित्त रॅलीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना मशीद आणि चर्च येथे नेण्यात आले होते. त्यानंतर मशिदीत खाऊचे वाटप करण्यात आले आणि मंदिरातही काही मिनिटांसाठी नेण्यात आले. मशिदीत विद्यार्थ्यांना उपदेशही केला. मशिदीत मुलींना मोठ्या रूमालाने हिजाब घातल्याप्रमाणे डोके झाकायला लावले आणि 'इस्लाम आतंक नव्हे आदर्श' हे पुस्तकही वाटले.
या घटनेनंतर पालकांना कुठलीही कल्पना न देता अशा प्रकारे सहल काढल्याविषयी संतापलेल्या पालकांनी आणि हिंदु संघटना यांनी भुसावळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली हाेती. हिंदूंच्या भावना दुखावल्याचा गुन्हाही नोंदवण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती.