लाचखोर मुख्याध्यापकावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल  File Photo
जळगाव

Jalgaon Bribe News | लाचखोर मुख्याध्यापकावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल

अकरा महिन्यांत दुसऱ्यांदा कारवाई; कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील संत हरिहर महाराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप प्रभाकर महाजन (वय ४५) यांच्याविरुद्ध पुन्हा एकदा लाच मागण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याच मुख्याध्यापकांविरुद्ध ११ महिन्यांपूर्वीही लाच घेतल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

विद्यालयात शिपाई पदावर कार्यरत असलेल्या तक्रारदाराने आपल्या पत्नीच्या वैद्यकीय खर्चासाठी २३,८१५ रुपयांचे मेडिकल बिल मुख्याध्यापकांकडे मंजुरीसाठी सादर केले होते. हे बिल वैयक्तिक ओळखीने सिव्हिल हॉस्पिटल आणि माध्यमिक शिक्षण विभागाकडून मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात संदीप महाजन यांनी ५,००० रुपयांची लाच मागितली होती.

२१ डिसेंबर २०२४ रोजी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दाखल केली. यानंतर पंचासमक्ष पडताळणी दरम्यान, मुख्याध्यापक महाजन यांनी बिलाच्या रकमेच्या १५ टक्के म्हणजेच ३,६०० रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले.

याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात महाजन यांच्या विरोधात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर, सुरेश पाटील, किशोर महाजन, बाळू मराठे, प्रदीप पोळ यांनी ही कारवाई पार पाडली.

पूर्वी सुद्धा घेतली होती लाच

दरम्यान, याआधीही मुख्याध्यापक महाजन यांनी शिपाई पदावरील याच तक्रारदाराकडून वेतन निश्चितीतील फरक म्हणून २ लाख ५३ हजार ७८० रुपयांच्या ५ टक्के प्रमाणे १२,५०० रुपयांची लाच मागितली होती. यापैकी १०,००० रुपये त्यांनी स्वीकारल्याचे सिद्ध झाल्याने २७ जून २०२४ रोजी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT