Jalgaon Crime News: जेवण न दिल्याच्या कारणावरून मुलाने आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील येवती येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव अलकाबाई पुरुषोत्तम वाघ असे असून त्यांचे वय ६३ वर्षे होते. त्या बोदवड तालुक्यातील येवती येथे मुलगा गणेश वाघ यांच्यासोबत राहत होत्या.
संशयित आरोपी गणेश पुरुषोत्तम वाघ याने आईने जेवण बनवून न दिल्याच्या कारणावरून राग मनात धरून रविवारी 25 ऑक्टोबर रोजी l झोपेत असलेल्या आईच्या डोक्यात लोणच्याची बरणी आणि लोखंडी खुरपने याने वार करून तिची निर्घुण हत्या केली.
घटनेनंतर या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी गणेश वाघ याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.