जळगाव

जळगाव : भुसावळ विभागाने 137 कोटी रुपयांचा महसूल मिळवला

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – भुसावळ विभागाने मे-२०२४ मध्ये महसुलाच्या विविध क्षेत्रात लक्षणीय वाढ साधून १३७ कोटी रुपयांची उल्लेखनीय महसूल मिळवला आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडे यांच्या नेतृत्वाखाली आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम करून हे उद्दिष्ट गाठले आहे.

भुसावळ विभागाने महसुलाचे उद्दिष्ट सध्या करीत मे महिन्यात प्रवासी महसुलाच्या बाबतीत, मे मध्ये ७५.९४ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. या यशामध्ये तिकीट तपासणीचे महत्त्वपूर्ण योगदान दिले असून एकूण ९६ हजार केसेस द्वारे ७.८२ कोटी रुपयांच्या महसुल प्राप्त झाला आहे.

विविध कोचिंग मधून मिळणाऱ्या महसुलातही लक्षणीय वाढ झाली असून रु. ०६.०६ कोटींवर पोहोचली आहे. विविध सेवा देण्याच्या विभागाच्या वचनबद्धतेमुळे माल वाहतुकीद्वारे ४९.३२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. मालगाड्यांनी मोटारगाड्या, पेट्रोलियम उत्पादने, कांदे, अन्नधान्य आणि सिमेंट वॅगनसह विविध प्रकारच्या मालाची कुशलतेने वाहतूक केली आहे.

पार्सल सेवेने एकूण ०३.२६ कोटी रुपयांचा महसूल मिळवला, जे ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यात भुसावळ मंडळाची बहुमुखी प्रतिभा दर्शवते. या व्यतिरिक्त, इतर विविध व्यावसायिक क्रिया कलापांमधून विविध महसूल २.७० कोटी आहे. ज्यामुळे विभागाच्या आर्थिक यशात आणखी भर पडली आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT