व्हिडीओ व्हायरल करण्याची तरूणीला धमकी  File Photo
जळगाव

Jalgaon Crime | भडगाव लॉजवर तरुणीवर अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची धमकी; नाशिकच्या तरुणाविरुद्ध गुन्हा

लग्नाचे आमिष दाखवून पाचोऱ्याच्या तरुणीची फसवणूक; नाशिकच्या तरुणाविरुद्ध भडगाव पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Bhadgaon Assault Case

जळगाव : लग्नाचे आमिष दाखवून एका २४ वर्षीय तरुणीला भडगाव येथील लॉजवर बोलावून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नराधमाने या कृत्याचे मोबाईलमध्ये फोटो आणि रेकॉर्डिंग करून, कोणास काही सांगितल्यास ते व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात नाशिक जिल्ह्यातील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा शहरात राहणारी २४ वर्षीय पीडित तरुणी शिक्षण घेत आहे. तिची नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिरडी रोहीळे येथील मनोहर देवराम खोटरे याच्याशी मैत्री झाली होती. या मैत्रीचा गैरफायदा घेत आरोपी मनोहर खोटरे याने पीडितेला लग्नाचे आश्वासन दिले. दि. ८ नोव्हेंबररोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास त्याने पीडितेला भडगाव येथील पाचोरा रोडवरील हॉटेलात बोलावून घेतले. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

फोटो काढून ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न

अत्याचार केल्यानंतर आरोपीने पीडितेचे मोबाईलमध्ये फोटो काढले व व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. तसेच या प्रकाराची कोणाकडे वाच्यता केल्यास हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला गप्प राहण्यास भाग पाडले. अखेर पीडितेने हिंमत एकवटून गुरूवारी (दि. १९) भडगाव पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार कथन केला.

बीएनएस कलम ६९ अन्वये गुन्हा दाखल

पीडित तरुणीच्या जबाबावरून भडगाव पोलिसांनी आरोपी मनोहर देवराम खोटरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ६९ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा (गुरन ३८३/२०२६) दाखल केला आहे. या घटनेत पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांसाठी 'ई-साक्ष' (e-Saksh) प्रणालीचा वापर केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश बाळासाहेब टाक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रताप पाटील हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT