Raksha Khadse met Nitin Gadkari
राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली.  Jalgaon Correspondent
जळगाव

Jalgaon| बऱ्हाणपूर अंकलेश्वर चौपदरीकरण रस्ता रावेर मार्गे होणार

पुढारी वृत्तसेवा

जळगांव : राष्ट्रीय महामार्ग बऱ्हानपूर-अंकलेश्वर रस्ता चौपदरीकरण हे मुक्ताईनगर तालुक्यातून न करता आधीच्या मूळ मार्गानेच रावेर व सावदा येथून करावे तसेच सदर रस्त्याचे सध्या चालू असलेले देखभाल दुरुस्ती तत्काळ सुरु करावे याबाबत ठेकेदाराला आदेश द्यावेत या मागणीसाठी आज दि. 26 रोजी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन मागणी केली.

रावेरकर होते नाराज

बुऱ्हानपूर-अंकलेश्वर रस्ता चौपदरीकरण हा रावेर सावदा येथूनच करावा यासाठी राज्यमंत्री केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. बुऱ्हानपूर-अंकलेश्वर रस्ता पूर्वीच्या मार्गाने न करता मुक्ताईनगर तालुक्यातील गावांमधून जाणार असल्याने रावेर तालुक्यातील नागरिकांमध्ये नाराजी होती, तसेच सदर महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रयत्नाने रु.६१ कोटी निधी मंजूर आहे.

रस्त्याचे चौपदरीकरण मंजूर

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रयत्नाने राष्ट्रीय महामार्ग बुऱ्हानपूर-अंकलेश्वर रस्त्याचे चौपदरीकरण मंजूर झाले असून जमीन संपादन बाबत नुकतेच राजपत्र काढण्यात आलेले होते. ठेकेदारा मार्फत दुरुस्तीचे काम संथ गतीने होत आहे व सध्या तर काम बंद आहे अश्या नागरिकांच्या तक्रारी होत्या.

बुऱ्हानपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण हे आधीच्या मूळ मार्गानेच करणे बाबत आदेश पारित करावे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली.

त्यानुसार केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज दि. 26 रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सदर महामार्ग पूर्वीच्या मार्गानेच करणे तसेच सदर रस्त्याची देखभाल दुरुस्ती असलेल्या ठेकेदारास काम तत्काळ सुरु करणे नाही तर कंत्राटदार बदलविणे बाबत ना. नितीन गडकरी यांना मागणी केली. यावर त्यांनी लवकरात लवकर कार्यवाही करणेबाबत आश्वासन दिले.

SCROLL FOR NEXT