जळगाव : जळगाव जिल्हा हा मध्य प्रदेश व इतर जिल्ह्यांना लागून असल्याने संवेदनशील जिल्हा म्हणूनही बघितला जातो. या जिल्ह्यात सिमीच्या झालेल्या कारवाईवरून संपूर्ण राज्यात जळगाव जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले. जळगाव शहरापेक्षाही मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या बऱ्हाणपूर या लागून असलेल्या रावेर तालुक्यात एटीएसने संगणक चालकाची कसून चौकशी केली आहे. संबंधित व्यक्तीचे संगणक तपासण्यात आले असून नंतर जाबजबाब नोंदवून त्याना सोडून देण्यात आले आहे. याबाबत मात्र कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
रावेर शहरात संगणक कोर्स शिकवणाऱ्या एका 35 वर्षीय तरुणाची एटीएस (ATS) टीमने कसून चौकशी केली असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात चर्चा सुरु आहे. याकरीता जिल्ह्याबाहेरून मोठ्या अधिकाऱ्यांचे पथक रावेर येथे दाखल झाले होते.
जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहरमध्ये सिमी संघटनेचे पाळेमुळे मुरल्यानंतर पोलीस यंत्रणा हादरली होती. पोलिसांनी सिमी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्यानंतर संपूर्ण राज्यात देशात याबाबत जळगाव जिल्ह्याची नाव चर्चेला होते. त्यानंतर सर्व देशातील यंत्रणा अलर्ट राहून जळगाव जिल्ह्यावर लक्ष ठेवून आहे.
यामध्ये नुकतेच रावेर मधील एका संगणक चालकाची एटीएसच्या माध्यमातून रविवार (दि.23) रोजी कसून चौकशी करण्यात आली. सदरील व्यक्ती हा संगणक सेंटर व्यवसाय करीत असून त्याच्या संपूर्ण संगणकाची तपासणी करण्यात आलेली आहे. या चौकशीत काहीच पर्याय व इतर कोणतेही माहिती मिळून आली नसल्यामुळे एटीएसने कोणती कारवाई न करता फक्त चौकशी करून संबंधित व्यक्तीला सोडून देण्यात आले आहे, याबाबत रावेर पोलिसात नोंद घेण्यात आलेली आहे.