जळगाव : धरणगाव व एरंडोल तालुक्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदांची निवड बुधवार (दि. १ ) बिनविरोध पार पडली. यामध्ये शिवसेना (शिंदे गटाचे) प्रेमराज पाटील सभापतीपदी तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) सुदाम पाटील उपसभापतीपदी म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत.
धरणगाव व एरंडोल तालुक्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती यांनी राजीनामे दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली होती. निवडणूक बिनविरोध झाल्याने महायुतीला (शिंदे गट शिवसेना व अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस) मोठा फायदा झाल्याचे मानले जात आहे.
या विजयानंतर येत्या काळात धरणगाव व एरंडोल तालुक्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही महायुतीची पकड मजबूत राहील, अशी चर्चा रंगत आहे.