Child Marriage  Pudhari
जळगाव

Jalgaon Child Marriage | अमळनेरमध्ये अल्पवयीन मुलीशी विवाह; पतीविरुद्ध गुन्हा

अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याप्रकरणी पतीविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Amalner Child Marriage Case

जळगाव : अमळनेर तालुक्यातील लाडगाव येथील १५ वर्षे ६ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीशी सुमारे वर्षभरापूर्वी विवाह केल्याप्रकरणी तिच्या पतीविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात बलात्कारासह पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव अजय कैलास अहिरे (रा. लाडगाव, ता. अमळनेर) असे आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेचा सुमारे वर्षभरापूर्वी भिल समाजाच्या रितीरिवाजानुसार अजय अहिरे याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर ती पती आणि सासरच्या मंडळींसोबत राहत होती. दरम्यान, पीडिता गर्भवती झाली.

गर्भावस्थेच्या सातव्या महिन्यात ती धुळे जिल्ह्यातील धनूर (कापडणे) येथील माहेरी गेली होती. ९ ऑगस्ट २०२६ रोजी पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने तिला उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचे वय १५ वर्षे ६ महिने असल्याचे आधारकार्डावरून स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून पुढील कारवाई केली.

या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पॉक्सो) कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत असून, प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT