सिग्नल कार्यान्वित असतांना वाहनधारक वाहतूक नियमांची पायमल्ली करत वाहन चालवित आहेत.  (छाया : नरेंद्र पाटील)
जळगाव

जळगाव : 'त्या' अपघातानंतर अखेर कालिका माता चौफुलीवर सिग्नल कार्यान्वित

सिग्नल यंत्रणा सुरू मात्र नियम धाब्यावर; मंदिरासमोर वाहनांची, व्यवसायांची गर्दी

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : वाळू वाहतूक करणाऱ्या एका डंपरखाली येऊन बालकाचा मृत्यू झाल्याच दुर्देवी घटना घडली होती. या घटनेनंतर कालिकामाता मंदिरासमोर सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची मागणी जोर धरु लागली होती. या मागणीनुसार येथील सिग्नल यंत्रणा सुरू झाल्यावर ही वाहतुकीचे नियम न पाळणारे वाहनधारकांमुळे इतरांचा जीव मात्र धोक्यात आलेला आहे. तर मंदिरासमोर व्यवसायिक व वाहनधारक व प्रवासी उभे राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सायंकाळी कालिका माता मंदिराजवळ भाच्याला मोटरसायकल वरून घेऊन जात असताना डंपरच्या धक्क्याने एका बालकाच्या जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत डंपर जाळून टाकला होता. यानंतर या ठिकाणी सुरेक्षेच्या दृष्टीने सिग्नल यंत्रणेची मागणी करण्यात येत होती. सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतरही वाहतूक नियम धाब्यावर ठेवत चौफुलीवर बेशिस्त वाहनधारकांमुळे इतरांचा जीव धोक्यात येत आहे. सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होत असतानाही जळगाव कडून भुसावळ कडे किंवा जुन्या जळगाव कडे जाताना मंदिरासमोर असलेल्या व्यवसायिक व प्रवासी यांच्यामुळे वाहनधारकात संभाव्य अपघात होऊ शकतो तर लहान वाहनधारक नियम धाब्यावर ठेवून आपल्या सोयीने रस्ता क्रॉस करताना दिसून येतात.

सिग्नल यंत्रणा लागली मात्र या ठिकाणी पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनधारक आपल्या मर्जीने वाहने चालवताना दिसून येतात.

सिग्नल यंत्रणा या ठिकाणी कार्यान्वित झालेली आहे. तरी नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. अतिक्रमणाचा विषय हा महानगरपालिकेचा आहे. तरी या ठिकाणी सकाळी किंवा सायंकाळी कर्मचारी नियुक्त केला जाईल.
राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, जळगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT