जळगाव : नववर्षाचे स्वागत करताना मद्यपी चालकांवर जळगाव शहरातील वाहतूक शाखा व पोलीस ठाणे यांनी 132 जणांवर कारवाई केली. यामध्ये 26 नागरिकांनी दोन लाख 60 हजार रुपये दंड भरला आहे.
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातच नव्हे तर देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांवर जळगाव वाहतूक शाखा व जळगाव शहरातील पोलीस स्टेशन अंतर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाईत 132 तळीरामांना पकडण्यात आले. त्यांच्यावर न्यायालयीन खटला दाखल करण्यात आला आहे. यामध्ये वाहतूक शाखेने 50 तळीरामांवर न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणानुसार 26 नागरिकांनी दोन लाख 60 हजार रुपये दंड 1 जानेवारी रोजी भरला आहे
जळगाव शहर वाहतूक शाखेने 2022 मध्ये 219, 2023 मध्ये 188 तर 2024 मध्ये 199 प्रकरणे दाखल असल्याचे नोंद आहे. यामध्ये 50 प्रकरणे 31 डिसेंबर तर 149 गुन्हे दाखल झाले होते. या खटल्यांपैकी 140 नागरिकांनी दंड भरलेला आहे