जळगाव

Jalgaon Accident | आई-वडिलांच्या डोळ्या देखत भरधाव टॅंकरने मुलाला चिरडले !

गणेश सोनवणे

जळगाव पुढारी वृत्तसेवा : पाचोरा तालुक्यातील बांबरुड फाट्यावर टँकरच्या धडकेत दुचाकीवरील १५ वर्षीय बालक ठार झाला. ही घटना सोमवार १७ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत पाचोरा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नरेंद्र भोसले हे आमडदे गावात राहतात. सोमवारी १७ जून रोजी नरेंद्र भोसले हे पाचोरा येथे पत्नी, मुलगा राजवीर आणि मुलगी यांच्यासह काही कामानिमित्त आलेले होते. रात्री दहा वाजेनंतर घरी आमडदे येथे परत जात होते. वाटेत बांबरुड फाट्याजवळ पावसामुळे रस्ते निसरडे झाल्याने त्यांच्या वाहनाला अपघात झाला. दुचाकीवरून सर्व खाली पडले. त्यात राजवीर नरेंद्र भोसले (वय १५) हा जवळून जाणाऱ्या टँकर खाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. डोळ्यादेखतच मुलाचा मृत्यू झाल्यामुळे भोसले परिवाराला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान राजवीर आणि जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथे राजवीर याला मयत घोषित करण्यात आले. तर नरेंद्र भोसले, त्यांच्या पत्नी व मुलीला किरकोळ खरचटल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत प्रथम भडगाव पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर पाचोरा पोलिसांकडे या घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी टँकर जप्त केला आहे.

हेही वाचा –

SCROLL FOR NEXT