जळगाव : दिशाच्या (जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती) बैठकीत 12 कोटींचा आढावा घेताना पंतप्रधान कृषी विमाबाबत प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना धारेवर धरले. रेल्वेच्या अधिकाऱ्यांना गावांची नावे माहिती नसल्याने व आपसात कम्युनिकेशन नसल्यामुळे कोणी ही योग्य अशी माहिती देत नव्हते. बीएसएनएलचे अधिकाऱ्यांना कोणती यंत्रणा बसवलेली आहे याबद्दल माहिती देताना योग्य माहिती देता येत नव्हती. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी खोटी माहिती दाखल केली. असे प्रकार दिशा बैठकी वेळी समोर आले आहेत. याबाबत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे हे संबंधित विभागाच्या मंत्र्यांना सूचित करणार आहेत.
जिल्हा नियोजन सभागृहामध्ये आयोजित दिशा (जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती) अंतर्गत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, आमदार राजू मामा भोळे, आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित व 27 विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली.
दिशाच्या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत केंद्रीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती देण्यात अडचणी व खोटी माहिती दिल्याचे उघड झाले. यावरून रक्षा खडसे यांनी त्यांना धारेवर धरत संबंधित विभागाच्या मंत्र्यांना याबाबत जाब विचारणार असल्याचे सांगितले.
दिशाच्या (जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती) बैठकीत बाराशे कोटीचा आढावा घेण्यात आला. यावेळी पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळत नसल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. चोपडा, पंचक व अशा अनेक गावांमध्ये कोड दिसत नाही त्याबाबत केंद्राशी संपर्क साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वे विभागाचे 300 कोटीचे कामे मंजूर आहेत. अमृत भारत योजनेंतर्गत कामे मंजूर असून रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती देण्यात अडचणी येत होत्या. विभागामध्ये समन्यवय नसल्याने रक्षा खडसे यांनी डी आर एम इती पांडे यांच्याशी संपर्क साधला.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्याच्या अभियंताला धारेवर धरत जळगाव तसेच भुसावळ सर्व्हींस रोडवरून धारेवर धरण्यात आले. राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्यात आल्याची माहिती देऊन माहिती घेतली असता ती खोटी निघाल्याचे देखील त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी शिवाजी पवार यांच्या कामाप्रती असलेल्या हलगर्जीपणाबाबत सुनावले. तसेच जर तुम्हाला काम करण्याची इच्छा नसेल तर बदली करून देते असे रक्षा खडसे यांनी बजावले.
जलशक्ती योजनेअंतर्गत वाघूर धरणाचे कामे पूर्ण झालेले आहेत पाणीसाठा ही पूर्ण क्षमतेने जमा होत आहे. उजव्या व डाव्या कालव्याचे काम झालेले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. वरणगाव, तळवेल या प्रकल्पांतर्गत ओझरखेडा डॅममध्ये येणाऱ्या गावाच्या रस्त्याचे काम साडे चौदा कोटी रुपयात देण्यात आल्यामुळे त्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. डब्ल्यू बी एम हा रस्ता साडे चौदा कोटीत साडेचार किलोमीटरचा कसा याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यानंतर अटल भूजल योजनेबाबत प्रश्न खडसे यांनी उपस्थित केला.
बीएसएनएलने 87 टाॅवरला सहा महिन्यापूर्वी मंजुरी मिळालेली असून त्यापैकी 16 टाॅवर रावेर, 20 टॉवर जळगाव मध्ये उभे करण्यात आलेले आहेत. पिक विमा योजनेचे साडेसहा हजार शेतकऱ्यांचे सॅटॅलाइट एजन्सी मार्फत कामे करण्यात आलेली आहेत. मात्र ही कामे देखील योग्य पद्धतीने केली नसल्याने शेतकऱ्यांना पिक विमा योजनेपासून वंचित रहावे लागत आहे. याबाबत तिन्ही यंत्रणेची बैठक लागण्याच्या सूचना रक्षा खडसे यांनी केल्या. बनाना क्लस्टर येत्या अधिवेशनात मंजुरीला ठेवणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कमी दरात रोप कसे उपलब्ध होईल शेतकऱ्यांसाठी ही क्लस्टर योजना असून त्यापासून अनेक फायदे होणार आहेत. तसेच त्यासाठी त्यांना ट्रेनिंग देखील मिळणार असल्याचे खडसे यांनी यावेळी नमूद केले.