हरीविठ्ठल नगरात मध्यरात्री घरात घुसून महिलेवर अत्याचार  
जळगाव

Jalgaon | हरीविठ्ठल नगरात मध्यरात्री घरात घुसून महिलेवर अत्याचार, संशयिताला अटक

पुढारी वृत्तसेवा

जळगाव | शहरातील हरीविठ्ठल नगरमध्ये राहणाऱ्या एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर जबरी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी ९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आले आहे. मंगेश उर्फ मंगलदास अंबादास कोळी वय-४० रा. हरीविठ्ठल नगर जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, हरीविठ्ठल नगर परिसरातील एका भागात २४ वर्षीय महिला ही आपल्या मुलांसह वास्तव्याला आहे. दरम्यान बुधवारी ९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास महिला ही आपल्या मुलांसह झोपलेली असताना संशयित आरोपी मंगेश उर्फ मंगलदास कोळी हा महिलेच्या घरात घुसला. त्यानंतर महिलेचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. तसेच घरातून जात असताना "तू जर कोणाला काही सांगितले तर तुला मारून टाकेल" अशी धमकी दिली. दरम्यान या संदर्भात पीडित महिलेने रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार रात्री १० वाजता संशयित आरोपी मंगेश उर्फ मंगलदास अंबादास कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील करीत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT