अत्याचार  file photo
जळगाव

जळगाव : व्याजाच्या पैशासाठी शिक्षकाने शाळेत मुलीचा केला विनयभंग

पुढारी वृत्तसेवा

जळगाव: आईने व्याजाचे पैसे देत नसल्याने शिक्षकाने भर शाळेत मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली असून शिक्षकासह चौघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'तुझी आई व्याजाचे पैस परत करत नाही, म्हणून तुला शाळेतून काढून टाकतो, असे म्हणत शाळेतील एका शिक्षकाने शाळेतच चौदा वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी व्याजाने पैसे देणाऱ्या सुवर्णा रामकृष्ण पाटील, रामकृष्ण देवराज पाटील, अजय शांताराम पाटील व वंदना अजय पाटील यांच्याविरुद्ध पोक्सोतंर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका परिसरात १४ वर्षीय मुलगी वास्तव्यास असून ती शहरातीलच एका शाळेत शिक्षण घेत आहे.

शहरात गृह उद्योग करणाऱ्या एका महिलेने व्यवसायासाठी पैसे घेतले होते. मात्र त्याचे व्याज न देता आल्याने या महिलेच्या मुलीच्या शाळेतील शिक्षकाने मुलीचा विनयभंग केला तसेच विद्यार्थिनीला मारून टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात शिक्षकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्यार्थीनीच्या आईने व्यवसायासाठी सुवर्णा रामकृष्ण पाटील (रा. संत मिराबाईनगर) व वंदना अजय पाटील (रा. श्रद्धा कॉलनी) यांच्याकडून दोन लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याच्या बदल्यात आतापर्यंत त्या विद्यार्थीनीच्या आईने संबंधितांना सहा लाख रुपये व्याजाची रक्कम परत केलेली आहे. मात्र, तरी देखील त्यांच्याकडून व्याजाच्या रकमेसाठी तगादा लावला जात होता. तसेच बुधवार (दि.१२) रोजी सुवर्णा पाटील रामकृष्ण देवराम पाटील, वंदना पाटील व तिचा पती तथा शिक्षक अजय पाटील या चौघां जणांकडून महिलेच्या घरी येवून गैरवर्तन करण्यात आले. या बाबत व्याजाच्या पैशासाठी महिलेला धमकावण्यातही आले.

मंगळवार (दि.१८) रोजी महिलेची १४ वर्षीय मुलगी शाळेत गेलेली असताना शिक्षक अजय पाटील याने तिचा शाळेत विनयभंग केला तसेच मुलीसोबत तिच्या बहिणीलाही मारुन टाकण्याची धमकी दिली. हा प्रकार झाल्यावर मुलीने घरी आल्यावर तिच्या आईलां याबद्दल सांगितले. या प्रकरणी विद्यार्थिनीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. रविवार (दि.२३) रोजी सुवर्णा पाटील, रामकृष्ण पाटील, अजय पाटील, वंदना पाटील यांच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT