जळगाव

जळगाव | मोटरसायकल चोरी रोखण्यासाठी विशेष पथक नेमणार : पोलीस अधिक्षकांची माहिती

गणेश सोनवणे

जळगांव : पुढारी वृत्तसेवा-  वाढत्या मोटरसायकल चोरीला आळा घालण्यासाठी एलसीबी मधून एक विशेष पथक निर्माण करून त्याचा शोध घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. तसेच वाळू चोरीच्या प्रश्नावर विचारले असता, त्या बाबत कोणत्याही वादात पडायचे नाही महसूल विभाग जेव्हाही पोलीस बळ मागेल तेव्हा त्यांना देण्यात येईल असे स्पष्टीकरण पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिले. मेट्रो सिटी व या सिटीमध्ये काम करताना फरक आढळतो. मनुष्यबळाचाही फरक पडतो. मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही असेही ते म्हणाले.

वाळू चोरी रोखण्याचे काम पोलिसांचे आहे असे जिल्हाधिकारी म्हणतात यावर बोलताना, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी म्हणाले की मला कोणत्याही वादात पडायचे नाही. मात्र महसूल विभाग जेव्हाही पोलीस बळाची मागणी करेल तेव्हा त्यांना देण्यात येईल. मेट्रो सिटी व इतर शहरी भागांमध्ये काम करताना वेगळा अनुभव येतो व मनुष्यबळाचाही फरक पडतो असे ते म्हणाले.

पोलीस सर्वांना सेवा देते मात्र जिल्ह्यात महिला, मुले वयस्कर व्यक्ती यांना प्राधान्य चांगले सेवा देण्याचे प्रयत्न असेल व त्यांना कायद्यानुसारच योग्य वागणूक व कारवाई केली जाईल. कायद्याबाबत किंवा कायद्यामध्ये बाधा निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व यापुढे एमपीडीए मोक्का प्रतिबंधक कारवाई या प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात करण्यात येतील.

जिल्ह्यातील ज्या तालुक्यात किंवा ज्या गावांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे त्या ठिकाणी अधिक सतर्क व पोलीस यंत्रणा अधिक कार्यान्वित तसेच व गुप्त यंत्रणा वाढवण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

सायबर क्राईम संदर्भात मजबुती व अत्याधुनिक करण्यासाठी आमचे प्रयत्न राहील. यासाठी सायबर कॅम्प सारखे विशेष आयोजन करून लोकांमध्ये जनजागृती करण्यात येईल. गुन्हेगारांवर डिटेक्शन करून त्यांना आत ठेवण्यावर आमचा जास्तीत जास्त भर असेल. जळगाव जिल्ह्यातील चोपडा या ठिकाणी असलेल्या उमर्टी येथून मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रांची विक्री होते त्यासाठी मध्य प्रदेश व जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे जॉइंट ऑपरेशन व सीमा बैठक लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT