जळगाव

जळगाव : विद्यार्थी, शासनाची फसवणूक करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

गणेश सोनवणे
जळगाव : पुढारी वृत्तसेवा –  श्रीहरी अपार्टमेंट त्र्यंबक नगर महाबळ व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण मंडळ या नावाने संस्था रजिस्ट्रेशन करून अभ्यासक्रम चालून, विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारून, खाजगी संस्थांना मान्यता देऊन बनावट प्रमाणपत्र देऊन शासनाच्या लोगोचा अनधिकृत वापर करून व शासनाच्या नावाने प्रमाणपत्र वितरीत करुन शासनाची व जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी रामानंद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरामधील हरी अपार्टमेंट त्र्यंबक नगर महाबळ या ठिकाणी राहणारे धनंजय दिनकर कीर्तने, सोनाली अमृत दहिभाते. अनिता धनंजय कीर्तने व व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण मंडळाचे इतर पदाधिकारी यांनी बेकायदेशीर व अनधिकृत रित्या व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण मंडळाचे नावाने संस्था स्थापन केली.
2 ऑगस्ट 2011 ते २३ फेब्रुवारी 2024 या काळात व्यवसाय शिक्षणाची संबंधित विविध अभ्यासक्रम चालवले व त्याबाबत शुल्कही आकारण्यात आले. खाजगी संस्था यांना मान्यता देऊन त्यांच्या उमेदवाराला प्रशिक्षण घेण्याचे बनावट प्रमाणपत्र देऊन शासनाच्या लोगो अनधिकृत वापरून बनावट शासकीय नावाचे प्रमाणपत्र छापून विद्यार्थ्यांना दिले. संस्थेस शासनाची मान्यता असल्याचे भासवून उमेदवारांची फसवणूक केल्याप्रकरणी संजय माधवराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील हे पुढील तपास करीत आहे.
SCROLL FOR NEXT