शेतकरी हवालदिल File Photo
जळगाव

Jalgaon : पाच वर्षांत 766 शेतकऱ्यांनी संपवले आयुष्य; 2025 मध्ये 77 शेतकरी मृत्युमुखी

481 पात्र, 289 अपात्र, तर 17 प्रकरणे अद्याप प्रलंबित

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : केळी व कापूस उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत शेतकरी आत्महत्यांचे भीषण चित्र समोर आले आहे. 2021 पासून 2025 सालाच्या एप्रिल अखेरपर्यंत एकूण 766 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी 481 शेतकरी शासकीय मदतीस पात्र ठरले असून 289 अपात्र ठरविण्यात आले आहेत. तर 17 प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत.

2025 च्या पहिल्या चार महिन्यांतच 77 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली असून त्यापैकी 29 पात्र, 31 अपात्र, तर 17 प्रकरणांची चौकशी सुरू आहे. फेब्रुवारीत 23 आणि मार्चमध्ये 29 जीवनयात्रा संपवल्याची नोंद आहे. मार्चमधील 10 प्रकरणे आणि एप्रिलमधील 7 प्रकरणे प्रलंबित आहेत.

वर्षनिहाय आकडेवारी....

  • 2021: शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली : 175, पात्र: 130, अपात्र: 45

सर्वाधिक शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली: सप्टेंबर (26), नोव्हेंबर (21), डिसेंबर (23)

  • 2022: शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली : 196 पात्र: 126, अपात्र: 70

सर्वाधिक शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली: मार्च (23), जून (22), नोव्हेंबर (23)

  • 2023: शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली: 150 पात्र: 100, अपात्र: 51

सर्वाधिक शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली: जानेवारी (22), जून (17), सप्टेंबर (17)

  • 2024: शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली: 168 पात्र: 96, अपात्र: 72

सर्वाधिक शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली: फेब्रुवारी (18), डिसेंबर (21)

  • 2025 (एप्रिलअखेर): शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली: 77 पात्र: 29, अपात्र: 31, प्रलंबित: 17

अवकाळी पावसाचा फटका

जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खरिप हंगाम सुरू होण्यापूर्वीच आलेल्या पावसामुळे पेरणी लांबणीवर गेली असून, परिणामी आर्थिक ताण वाढला आहे. या प्रतिकूल परिस्थितीने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना जीवनयात्रा संपवावे लागत असल्याचे भयावह चित्र समोर येत आहे.

जळगाव जिल्हा हा केळी व कापूस उत्पादनात राज्यात अग्रगण्य असून, येथील केळीची देशभरात तसेच परदेशातही मागणी आहे. तरीही, नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा व बाजारातील अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांचे जीवन संकटात सापडले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT