जळगाव : जळगाव जिल्ह्यातील बारावीच्या निकालात यंदाही मुलींनी आघाडी घेतली आहे. विज्ञान, कला आणि वाणिज्य या तिन्ही विभागांमध्ये मुलींचा निकाल मुलांपेक्षा अधिक टक्केवारीने लागला आहे.
सायन्स विभागात एकूण 24,230 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 24,201 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये 23,943 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल 98.93 टक्के लागला आहे. यामध्ये मुलांचा निकाल 98.67% तर मुलींचा निकाल 99.27% इतका आहे.
कला विभागात एकूण 14,679 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, त्यापैकी 14,555 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये 12,659 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल 86.97% लागला आहे. यामध्ये मुलांचा निकाल 83.09% तर मुलींचा निकाल 91.32% इतका आहे.
वाणिज्य विभागात 4,796 विद्यार्थ्यांपैकी 4,781 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 4,662 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल 97.51% लागला आहे. मुलांचा निकाल 96.66% तर मुलींचा निकाल 98.34% इतका आहे.
व्होकेशनल कोर्स (HSC Vocational) मध्ये एकूण 1,172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1,151 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 989 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल 85.92% लागला आहे. मुलांचा निकाल 83.27% तर मुलींचा निकाल 86.90% इतका आहे.
टेक्निकल सायन्स (Tech Sci) विभागात एकूण 48 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी 42 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल 87.50% लागलेला आहे.
एकूणच शिक्षण क्षेत्रात मुलींची कामगिरी कौतुकास्पद असून यंदाही मुलींनी यशाची परंपरा कायम ठेवली आहे.