India vs Pakistan Match Betting Raid  (Pudhari File Photo)
जळगाव

India vs Pakistan Match Betting Raid |इंडीया पाकिस्तान मॅचवर बेटींग कारवाई

दोन जणांसह 1 लाख 5 हजाराचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : दुबईमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यांवर विशेषतः भारत आणि पाकिस्तानच्या मॅचवर ऑनलाईन बेटींग (सट्टा) खेळविणारे ०२ व्यक्तींवर स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

दुबई येथे ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटचे सामने सुरू आहे. 21 रोजी भारत पाकिस्तानचा सामना होता. स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव येथील पोउपनि शरद बागल व त्यांचे पथकातील अंमलदार यांना गोपनिय बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, भुसावळ बाजार पोलीस स्टेशन हद्दीत आरोपी प्रकाश हुंदामल सारडा रा. नवजीवन सोसायटी, सिंधी कॉलनी, भुसावळ, हा त्याचे राहते घरी इंडीया वि. पाकिस्तान क्रिकेट मॅचवर ऑनलाईन बेटींग (सट्टा) खेळवित आहे.

अशी गोपनिय माहिती प्राप्त झाली, सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राहुल गायकवाड, यांना देवून त्यांनी छापा टाकला. आरोपी प्रकाश हुदामल कारडा वय ५५ वर्ष रा. सिंधी कॉलनी, भुसावळ, आरोपी रणजीत चत्रभान हंडी वय 35 वर्ष रा. गणपती नगर, जळगांव हे इंडीया वि. पाकिस्तान क्रिकेट मॅचवर ऑनलाईन बेटींग (सट्टा) खेळवितांना मिळुन आल्याने त्यांचे जवळून १लाख ०५ हजार रुपये किमातीचे ऑनलाईन बेटींग (सट्टा) चे साहित्य जप्त करण्यात आले असून त्यांचे विरुध्द भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. येथे सीसीटीएनएस गुरनं. ४५८/२०२५ महाराष्ट्र जुगार अधि. कलम ४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी, भुसावळ उपविभाग संदीप गावीत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राहुल गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, श्रे. पोलिस उपनिरीक्षक रवि नरवाडे, पोहेकॉ उमाकांत पाटील, विकास सातदिवे, राहुल वानखेडे, प्रशांत परदेशी, दर्शना पाटील, भरत पाटील सर्व स्थागुशा, जळगांव यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT