जळगाव : नरेंद्र पाटील
राज्यासह देशातही इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये वाढ झालेली आहे. मात्र यामध्ये सर्वाधिक फटका हा सरकारी मराठी शाळांना बसला आहे. ज्या शाळांमध्ये एका काळात विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात होती आज त्याच शाळांना घरघर लागलेली आहे. 2005 या वर्षामध्ये जळगाव महानगरपालिकेच्या मराठी 21, हिंदी 2 व उर्दू 21 अशा शाळा होत्या. परंतु आजच्या घडीला मराठी 12 हिंदी 1 उर्दू 10 अशा शाळा उरल्या आहेत. महानगरपालिकेचा विकास म्हणजे आशिया खंडातील सर्वात मोठी इमारत आहे. त्याच महानगरपालिकेत मराठी शाळांना मात्र घरघर लागलेली आहे.
महाराष्ट्रात मराठी ही प्रमुख भाषा आहे. मात्र शासनाच्या महानगरपालिका व नगरपालिकेच्या मराठी शाळांना घरघर लागलेली आहे. ज्या शाळेत 'छडी लागे छम छम, विद्या ही घम घम" अशी अवस्था होती तेथे आज शांतता आहे.
इंग्रजी माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे महानगरपालिकेने शाळेमध्ये तोच शिक्षणाचा दर्जा किंवा विद्यार्थ्यांना आकर्षण करण्यासाठी तशी पॉलिसी किंवा नियमावली आणण्यात अपयशी ठरलेले दिसून येत आहे. त्यामुळेच मराठीच्या तब्बल 10 शाळा कमी झालेल्या आहेत. हिंदीची एक व उर्दूच्या अकरा शाळा कमी झालेल्या आहेत.
असे असतानाही महानगरपालिकेच्या शाळेमध्ये 4,735 विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत. यामध्ये मराठी शाळेत 902, हिंदीमध्ये 53 व उर्दू शाळेमध्ये 3,755 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महानगरपालिका चार माध्यमिक शाळा चालवीत आहेत. त्यामध्ये संपूर्ण पैसा हा महानगरपालिकेमध्ये 445 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये दोन मराठीच्या शाळा असून 53 विद्यार्थी व दोन उर्दूच्या शाळा असून त्यामध्ये 392 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मराठी शाळेकडे फिरवलेली पाठ हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. शासन सर्व सुविधा उपलब्ध करून देत असतानाही मराठीच्या शाळांना एवढी घर घर का लागली हा प्रश्न उपस्थित होत आहे.
मनपा शाळा जळगाव -
मराठी माध्यम -
मनपा प्राथमिक शाळा (पहिली ते आठवी )
एकूण शाळा -१२
पटसंख्या -९०२
कार्यरत शिक्षक -५३
मनपा माध्यमिक - (आठवी ते दहावी )
शाळा - २
पट संख्या - ५३
शिक्षक - ४
मनपा उर्दू माध्यम
मनपा प्राथमिक शाळा (पहिली ते आठवी )
एकूण शाळा -१०
पटसंख्या - ३७५५
शिक्षक - ८६
मनपा उर्दू माध्यमिक (आठवी ते दहावी )
शाळा -२
पट -४४५
शिक्षक -१०
मनपा हिंदी माध्यम (पहिली ते सातवी)
शाळा - १
पट - ७८
शिक्षक -५
सन -२००५ पूर्वी मनपा शाळांची एकूण संख्या - ३४
(मराठी -२१, हिंदी -२, उर्दू -२१)
एकत्रिकरण व बंद झालेल्या शाळांची संख्या - ११
2025 आजपर्यंत सुरु असलेल्या शाळांची संख्या - २३
( मराठी -१२, हिंदी -१, उर्दू - १० )
आज रोजी विद्यार्थी संख्या (सर्व माध्यम ) - ४७३५
आगामी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये जळगाव मनपा शाळांची गुणवत्ता वाढवून, त्यांच्या पटसंख्यामध्ये वाढ करण्याचे आमचे ध्येय आहे. फक्त मनपा शाळांना वाचविण्यासाठी प्रशासन अधिकारीचा अतिरिक्त पदभार स्विकारला आहे. जास्तीत जास्त मनपा शाळांना सेमी इंग्रजी माध्यमिक शाळा करायचे आहे. मोफत शिक्षण देणारे मनपा शाळा आताच्या काळात वाचू शकले नाही तर भविष्यात त्यांचे अस्तित्व राहणार नाही.खलील शेख, प्रभारी शिक्षण अधिकारी