जळगाव : भुसावळ तालुक्यातील वरणगावजवळ असलेल्या तापी आणि पूर्णा नद्यांवर बांधलेल्या हतनूर धरणातून गुरुवारी (दि. १० जुलै) रात्री १० वाजता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने धरणाचे आठ दरवाजे प्रत्येकी १ मीटरने उघडण्यात आले. त्यामुळे १५,२५६ क्युसेक (४३२ क्युसेक) पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पाणीपातळी: २१०.५८० मीटर (पूर्ण जलाशय पातळी: २१४.०० मीटर)
एकूण साठवण: २१७.२० द.ल.घ.मी (५५.९८%)
जिवंत साठवण: ८४.२० द.ल.घ.मी (३३.०२%)
रेडियल गेट उघडणे: ८ दरवाजे प्रत्येकी १.०० मीटर
कालवा व आर.एस. गेट डिस्चार्ज: शून्य
आजचा पाऊस: ० मिमी असून एकूण पाऊस: १९२ मिमी नोंदवण्यात आला आहे
धरण जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, संभाव्य पूरस्थितीचा अंदाज घेऊन स्थानिक यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.