हतनूर धरणातून होतेय पाण्याचे बाष्पीभवन Pudhari News Network file Photo
जळगाव

Hatnur Dam Jalgaon | जळगाव जिल्ह्यात पाणीसंकट गडद; हतनूरमधील जलसाठ्यात घट

'मे हिट'चा अनुभव एप्रिलमध्येच

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जळगाव जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच तापमानाचा उच्चांक नोंदवला जात असून, त्यामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक गडद झाली आहे. एप्रिलमध्येच तापमान 43 ते 44 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले आहे, त्यामुळे 'मे हिट'चा अनुभव एप्रिलमध्येच येऊ लागला आहे.

आठ पाण्याचे टँकर सुरू

जिल्ह्यातील अंमळनेर, भडगाव, जामनेर व चाळीसगाव या तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. या चार तालुक्यांतील सात गावांमध्ये सुमारे आठ पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत. पाणीटंचाईमुळे विहिरींच्या अधिग्रहणालाही गती देण्यात आली असून, एरंडोल तालुक्यात 1, मुक्ताईनगरमध्ये 4, पाचोरामध्ये 4, चाळीसगावमध्ये 4 आणि अंमळनेर तालुक्यात 8 अशा एकूण 31 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

जलसाठ्यात यंदा तीन टक्क्यांनी घट

दरम्यान, जिल्ह्यातील प्रमुख जलस्रोतांमध्ये हतनूर, गिरणा आणि वार प्रकल्पांचा समावेश होतो. यावर्षी हातनूर धरणात फक्त 44.78 टक्के जलसाठा शिल्लक आहे, तर गतवर्षी याच कालावधीत तो 47.6 टक्के होता. म्हणजेच हतनूरमध्ये यंदा सुमारे तीन टक्के जलसाठ्यात घट झाल्याचे समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT