जळगाव : जे लोक टीका करायचे ते माणसे सत्य शिवाय जगू शकत नाही आम्ही सत्ता गेली तरी पक्षांतर करण्याचा विचार केला नाही. शिवसेना सोडली असे कोणी म्हणत असेल तर शिवसेना सोडली नाही बाळासाहेब भगवा वाचण्यासाठी शिंदे साहेबांची साथ दिली. असे वक्तव्य स्वच्छता व पाणीपुरवाठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पाळधी येथे झालेल्या अभिष्टचिंतन कार्यक्रमात बोलताना केले.
पाटील यांच्यावर हजारो कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या वर्षाव केला. यावेळी पाळधी या ठिकाणी आयोजित अभिष्टचिंतन कार्यक्रमांमध्ये बोलताना नामदार गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर टीका केली.
पुढे बोलताना ते म्हणाले एक वर्षांपूर्वी येथे सभा झाली होती भाजपा सेनेची युती होणार हे पक्के झाले होते. आमच्यावर गद्दारीचा शिक्का लावल्यानंतर असे होते की पुन्हा निवडून येणार नाही जे गेलेले आहेत शिवसैनिक यांना जनता निवडून देणार नाही. लोकसभेचे चित्र पाहिले तर रावेर जळगाव लोकसभा सोडल्यानंतर कल्याण पर्यंत एकही सीट आली नाही आपले 17 खासदार आले त्यांचे 31 खासदार निवडून आले. त्यामुळे लोकसभेनंतर विधानसभेत समोरच्यांच्या विजय होईल त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री ठरला मंत्रिमंडळाचे नावे ठरली फक्त शपथविधी घेण्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र कार्यकर्त्यांनी जे काम केले त्यामुळेच आम्ही निवडून आलो.
जळगाव जिल्ह्यामध्ये सर्व आमदारांच्या सहकार्यामुळे डीपीडीसी मधील शंभर टक्के निधी खर्च झाला. हा जळगाव जिल्हा राज्यातील पहिला जिल्हा होता की जेणेकरून शंभर टक्के निधी खर्च केलाय त्यामुळेच 77 कोटी रुपये वाढवून आले. आणि या निधीचा फायदा जळगाव जिल्ह्यासाठीच होणार आहे. असेही गुलाबराव पाटील म्हणाले.