गुलाबराव देवकर, नेते, शरद पवार गट file photo
जळगाव

गुलाबराव देवकरांनी लोकसभेत मदत केली : गुलाबराव पाटील

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण व माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्यात झालेल्या बैठकीवर बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, त्यांनी लोकसभेत आम्हाला मदत केली आहे त्या माणसाची बदनामी कशाला करायची, असे वक्तव्य केले. जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री यांचे 13 ऑगस्ट रोजी आगमन होणार आहे, त्या संदर्भात गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

विधानसभा निवडुणकीचे वेध लागल्यानंतर राज्यभर महायुतीसह महाविकास आघाडीने मोर्चे बांधणीला सुरूवात केलेली आहे. यामध्ये जागा वाटपाबाबतचे नियोजन करण्यासाठी अनेकजण कामाला लागलेले आहेत.

मुख्यमंत्री यांची मंगळवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सभा होणार आहे. या सभेत होणाऱ्या कार्यक्रमाविषयी माहिती देताना राजकीय विषयावर प्रश्न विचारण्यात आले. त्यावर गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, प्रत्येक पक्षाची निवडणुकीच्या तयारी असते. चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या भेटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की, जळगाव लोकसभेत देवकर यांनी मंगेश चव्हाण यांच्या सोबत गोड चहाचा आस्वाद घेतला आहे. लोकसभेत आमचे काम केले आहे त्यामुळे त्या माणसाची बदनामी कशाला करावी, असे म्हटलं आहे.

भाजपा जरी जिल्ह्यात अकरा सीटांवर तयारी करत असली तरी जळगाव ते कल्याणपर्यंत भाजपच्या दोनच सीट आहेत. बाळासाहेब यांची शपथ घेऊन सांगतो की, शिंदे सेनेने युतीचे काम केलेले आहे. भाजपाच्या नेत्याने ते मान्य केले आहे. त्यामुळे मला वरीष्ठांच्या नेतृत्वावर विश्वास आहे.

आमदार चव्हाण, गुलाबराव देवकर यांच्या भेटीत दडलय काय

विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात मंत्री गुलाबराव पाटील हे गेल्या दोन पंचवार्षिक पासून सलग निवडून येत आहेत. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मंत्री गुलाबराव पाटील यांंच्या विरोधात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आतापासूनच तयारी केल्याचे दिसून येत आहे. याचवेळी चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी गुलाबराव देवकर यांची अचानक भेट घेऊन शिवसेना शिंदे गटाला पर्यायाने मंत्री गुलाबराव पाटील यांना जणू अप्रत्यक्ष इशारा दिला असल्याचे या भेटीतून समोर येत असल्याच्या चर्चा रंगत आहेत.

केवळ सदिच्छा भेट

"आम्ही एकाच तालुक्याचे रहिवासी आहोत. भाजपचा मेळावा आटोपून इकडून जात होतो, देवकर अप्पा येथे असल्याचे समजल्याने सदिच्छा भेट घेतली. बाकी राजकीय विषय काहीच नव्हता," अशी प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT