भुसावळ - नंदुरबार रेल्वे मार्गावर मालगाडी घसरल्याने वाहतूक विस्कळीत  (Pudhari Photo)
जळगाव

Jalgaon Railway News | अमळनेर स्थानकाजवळ मालगाडी घसरली; गाड्यांचे मार्ग बदलले, काही गाड्या रद्द

Amalner Train Derailment | भुसावळ - नंदुरबार रेल्वे मार्गावर मालगाडी घसरल्याने वाहतूक विस्कळीत

पुढारी वृत्तसेवा

Amalner Train Derailment Train Route Diversion

जळगाव : भुसावळ - नंदुरबार रेल्वे मार्गावर एक मालगाडी अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयाजवळ आज (दि. १५) दुपारी २ वाजता रुळावरून घसरली. त्यामुळे काही गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले आहेत. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मार्ग वळविण्यात आलेल्या गाड्या (दिनांक 15.05.2025):

गाडी क्र. 09066 छपरा – सुरत विशेष गाडी ही भुसावळ, मनमाड, इगतपुरी, कल्याण, वसई रोड, सुरत मार्गे वळविण्यात आली आहे.

गाडी क्र. 19046 छपरा – सुरत एक्सप्रेस ही भुसावळ, मनमाड, इगतपुरी, कल्याण, वसई रोड, सुरत मार्गे वळविण्यात आली आहे.

गाडी क्र. 22723 नांदेड – श्री गंगानगर एक्सप्रेस ही जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, रतलाम, चित्तौडगड, अजमेर, मारवाड मार्गे वळविण्यात आली आहे.

गाडी क्र. 20934 दानापूर – उधना एक्सप्रेस ही भुसावळ, मनमाड, इगतपुरी, कल्याण, वसई रोड, सुरत मार्गे वळविण्यात आली आहे.

गाडी क्र. 06157 चेन्नई सेंट्रल – भगत की कोठी विशेष गाडी ही भुसावळ कॉर्ड लाईन, खंडवा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, रतलाम, चित्तौडगड, अजमेर, मारवाड मार्गे वळविण्यात आली आहे.

गाडी क्र. 22972 पाटणा – बांद्रा टर्मिनस एक्सप्रेस ही भुसावळ, मनमाड, इगतपुरी, कल्याण, वसई रोड, बांद्रा टर्मिनस मार्गे वळविण्यात आली आहे.

गाडी क्र. 20861 पुरी – अहमदाबाद एक्सप्रेस ही भुसावळ कॉर्ड लाईन, खंडवा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, रतलाम, अहमदाबाद मार्गे वळविण्यात आली आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या (दिनांक 15.05.2025):

गाडी क्र. 19004 भुसावळ – दादर एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

गाडी क्र. 19006 भुसावळ – सुरत एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

गाडी क्र. 19008 भुसावळ – सुरत एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT