Gold Price Hike Pudhari File Photo
जळगाव

Gold Price Hike | सुवर्णनगरीत सोन्याला 'झळाळी': २४ तासांत चांदी ८ हजारांनी महागली

जळगावच्या सुवर्णबाजारात सोन्याच्या दरात १५०० रुपयांची वाढ; लग्नसराईच्या तोंडावर दरवाढीचा 'भडका'

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जळगावच्या सुवर्णबाजारात पुन्हा एकदा दरवाढीचा मोठा स्फोट झाला आहे. अवघ्या २४ तासांत सोने आणि चांदीच्या भावाने मोठी उसळी घेतली आहे. सोन्याच्या दरात प्रति १०-२० ग्रॅममागे १५०० रुपयांची वाढ झाली असताना, चांदीने मात्र सर्वांनाच धक्का देत तब्बल ८ हजार रुपयांची झेप घेतली. जागतिक बाजारपेठेतील घडामोडींचा थेट परिणाम जळगावच्या बाजारपेठेवर दिसून येत आहे. या दरवाढीमुळे सामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

सोन्याचा 'भाव' वधारला!

दि. ५ मे रोजी २२ कॅरेट सोन्याचे दर १,३७,४०० रुपये होते, ते आज ७ मे रोजी थेट १,३८,७७० रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजेच यात १३७० रुपयांची वाढ झाली आहे. तर शुद्ध सोने अर्थात २४ कॅरेटचा विचार करता, १,५०,००० रुपयांवरून हे दर आता १,५१,५०० रुपयांवर गेले आहेत. लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू असतानाच सोन्याने दीड लाखांचा टप्पा ओलांडल्याने वधू-वर पित्यांचे बजेट कोलमडणार असल्याचे चित्र आहे.

सोन्यापेक्षाही अधिक धक्कादायक वाढ चांदीच्या दरात पाहायला मिळाली आहे. ५ मे रोजी २,४९,००० रुपये किलोच्या आसपास असणारी चांदी आज थेट २,५७,००० रुपयांवर पोहोचली आहे. अवघ्या दोन दिवसांत चांदीच्या दरात ८ हजार रुपयांची वाढ झाल्याने चांदी खरेदी करणाऱ्यांची मोठी गोची झाली आहे.

जळगाव मार्केटमधील दराची स्थिती एका नजरेत:

धातू (प्रकार)

सोने (२२ कॅरेट)

१,३७,४००. दर (५ मे)

१,३८,७७०. दर (७ मे)

+१,३७०. फरक (वाढ)

सोने (२४ कॅरेट)

१,५०,०००. दर (५ मे)

१,५१,५००. दर (७ मे)

+१,५००. फरक (वाढ)

चांदी (प्रति किलो)

२,४९,०००. दर (५ मे)

२,५७,०००. दर (७ मे)

+८,०००. फरक (वाढ)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT