जळगाव : 'सुवर्णनगरी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावात सोन्या-चांदीच्या दराने आजवरचे सर्व उच्चांक मोडीत काढत अक्षरशः उसळी घेतली आहे. अवघ्या एका दिवसात चांदीच्या दरात तब्बल २३ हजार रुपयांची प्रचंड वाढ झाली असून, सोन्यानेही ४ हजार ७०० रुपयांची झेप घेतली आहे.
काल (२७ जानेवारी) स्थिर वाटणारी बाजारपेठ आज (२८ जानेवारी) सकाळी उघडताच दरांच्या भडक्याने हादरून गेली. २७ जानेवारीला १ लाख ५९ हजार ३०० रुपयांवर असलेले २४ कॅरेट सोने आज थेट १ लाख ६४ हजार रुपयांवर पोहोचले. तर, २२ कॅरेट सोन्यातही मोठी वाढ होऊन ते १ लाख ५० हजार २२५ रुपयांवर गेले आहे.
सर्वांत मोठा धक्का चांदीच्या दरात बसला आहे. २७ जानेवारीला ३ लाख ४५ हजार रुपये किलो असलेली चांदी आज एकाच झटक्यात ३ लाख ६८ हजार रुपयांवर पोहोचली आहे. एका दिवसात तब्बल २३ हजार रुपयांची वाढ झाल्याने गुंतवणूकदारही अवाक झाले आहेत.
२२ कॅरेट सोने
१,४६,५६० रु.
१,५०,२२५ रु.
+ ३,६६५ रु.
२४ कॅरेट सोने
१,५९,३०० रु.
१,६४,००० रु.
+ ४,७०० रु.
३,४५,००० रु.
३,६८,००० रु.
+ २३,००० रु.
सोन्या-चांदीचे दर आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. "लग्नासाठी सोने घ्यायचे तरी कसे?" असा उद्विग्न सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.