Gold Silver Price Drop Pudhari
जळगाव

Gold Price fall: सोन्याची भरारी उतरली; सलग दोन दिवसांच्या तेजीनंतर भावात घसरण

जळगावच्या सुवर्णबाजारात सोन्यात सुमारे १५०० रुपयांची घट; चांदीही ४ हजारांनी स्वस्त

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून गगनभरारी घेणाऱ्या मौल्यवान धातूंच्या किमतींना सोमवारी अचानक ब्रेक लागला. १४ आणि १५ मार्च रोजी उच्चांक गाठलेले सोने-चांदीचे दर १६ मार्च रोजी घसरले. सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे सुमारे १५०० रुपयांची घट झाली असून चांदीच्या किमतीतही लक्षणीय घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

जळगावच्या सराफ बाजारात १४ आणि १५ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५७,५०० रुपयांवर पोहोचला होता. मात्र सोमवारी हा दर घसरून १,५६,००० रुपयांवर आला. म्हणजेच एका दिवसात तब्बल १,५०० रुपयांची घट नोंदवली गेली. त्याचप्रमाणे २२ कॅरेट दागिन्यांच्या सोन्याच्या दरातही घट झाली असून तो १,४२,८९० रुपयांवर स्थिरावला आहे.

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी पडझड झाली आहे. रविवारी प्रति किलो २,६०,००० रुपयांवर असलेली चांदी सोमवारी थेट २,५६,००० रुपयांवर आली. म्हणजेच एका दिवसात चांदी ४,००० रुपयांनी स्वस्त झाली. त्यामुळे खरेदीदारांमध्ये काहीसा उत्साह दिसून येत आहे.

२४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम)

  • १४–१५ मार्च : १,५७,५०० रुपये

  • १६ मार्च : १,५६,००० रुपये

  • घट : १,५०० रुपये

२२ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम)

  • १४–१५ मार्च : १,४४,२७० रुपये

  • १६ मार्च : १,४२,८९० रुपये

  • घट : १,३८० रुपये

चांदी (प्रति किलो)

  • १४–१५ मार्च : २,६०,००० रुपये

  • १६ मार्च : २,५६,००० रुपये

  • घट : ४,००० रुपये

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींचा परिणाम स्थानिक बाजारावर दिसून येत आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असताना झालेली ही घसरण ग्राहकांसाठी सुवर्णसंधी मानली जात असली, तरी बाजारातील अस्थिरता व्यापाऱ्यांची धडधड वाढवणारी ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT