गिरीश महाजन यांच्यावर वरणगाव येथील रूग्णालयात उपचार करण्यात आले.  Pudhari Photo
जळगाव

शहीद जवानाचे अंत्यदर्शन घेताना गिरीश महाजन जखमी; तातडीने नाशिककडे रवाना

Girish Mahajan | वरणगाव येथील अर्जुन लक्ष्मण बाविस्कर शहीद

पुढारी वृत्तसेवा

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : वरणगाव येथे शहीद जवानाच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आज (दि. २७) जखमी झाले. त्यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागल्याने रक्तस्त्राव झाला. दरम्यान, रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते तातडीने महत्त्वाची बैठक असल्याने नाशिककडे रवाना झाले. (Girish Mahajan)

वरणगाव येथील शहीद जवान अर्जुन लक्ष्मण बाविस्कर यांना मानवंदना देण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आज वरणगाव शहरात दाखल झाले. शहीद जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मिल्ट्रीच्या ट्रॅक मध्ये उंचावर जंप मारून ते चढले. मात्र, ट्रॅकचा वरचा रॉड थेट त्यांच्या डोक्याला लागला. जखम होऊन रक्तस्राव झाला. क्षणभर त्यांना चक्कर आली. त्याच स्थितीत त्यांनी शहीद जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिव देहाला पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर वरणगाव येथील निमजाय हॉस्पिटल येथे त्यांनी उपचार घेतले. त्यानंतर ते तातडीने महत्वाची बैठक असल्याने नाशिककडे रवाना झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT