जळगाव : शहरातील पिंप्राळा रोड परिसरात राहणाऱ्या २ भामट्यांनी एका वृध्दाच्या ६० हजार रूपये किंमतीच्या दोन अंगठ्या चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि.१५) सायंकाळी ६ वाजता समोर आली आहे. याबाबत मंगळवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चुन्नीलाल दौलत पाटील (वय ६८) हे कुटुंबियांसह पिंप्राळा रोड परिसरात वास्तव्याला आहेत. सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास त्यांच्या घराजवळ उभे असताना त्यांच्याजवळ दोन अनोळखी व्यक्ती आले. दोघांनी चुन्नीलाल पाटील यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याजवळील ६० हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या अंगठ्या चोरून नेल्या. हा प्रकार घडल्यानंतर पाटील यांनी दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.१६) रामानंद नगर नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे हे करीत आहे.