जळगाव : भाजपात प्रवेश करण्यासाठी आपण विनंती केल्यानंतर प्रवेशही झाला होता. मात्र, खाली विरोध असल्याने अजून तो जाहीर नाही. त्यामुळे आता अधिक वाट पाहत न राहता राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार असल्याचे संकेत आमदार एकनाथ खडसे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिले.
आ. खडसे म्हणाले, भाजपात जाणारे प्रवेश करणार या वावड्या लोकसभेपूर्वी खूप उडाल्या होत्या. मात्र, प्रवेश झाला की, नाही झाला यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. मात्र, आपला राष्ट्रीय अध्यक्ष लड्डा, विनोद तावडे व रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला होता. परतू खाली काही लोकांचा त्याला विरोध होता, म्हणून हा प्रवेश जाहीर होऊ शकला नसल्याचे त्यांनी सांगितले अशा परिस्थितीत भाजपत राहणे पसंत नसल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली.