रौप्य पदक पटकाविणारा जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा दानिश रहेमान तडवी. समवेत प्रशिक्षक जयेश बाविस्कर Pudhari News network
जळगाव

जळगावच्या दानिश तडवीने राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत पटकावले रौप्य

Taekwondo Championships : मध्य प्रदेश (देवास) येथे ६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धा

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : मध्य प्रदेश शासन व स्कूल शिक्षा विभाग, जिल्हा देवास येथे ६८ व्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १९ वर्षे वयोगटाच्या आतील व ४५ किलो वजनाच्या आतील वजन गटात मुलांमध्ये दानिश रहेमान तडवी याने रौप्य पदक पटकावले.

मध्य प्रदेश (देवास) येथे सुरू असलेल्या ६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धा पार पडल्या असून यामध्ये १९ वर्षे वयाेगट आतील मुलांमध्ये जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा दानिश रहेमान तडवी याला रौप्य पदक मिळाले आहे.

दानिश तडवी याने पहिल्या फेरीत झारखंडचा खेळाडू दिपक कुमार यास २२ - ०९ , १२ - ० ने हारवले. दुस-या फेरीत वेस्ट बंगालच्या जित शाॅ ला २४-१७, २२-१० च्या फरकाने नमवले. तिसऱ्या फेरीत उत्तराखंड चा राॅबिन सिंग याला २० -०८, १४-०१ ने मारून सेमी फायनल मध्ये प्रवेश केला. सेमी फायनल मध्ये दानिशने बिहारचा प्रिन्स कुमार यास २६-१७, २२- १४ च्या फरकाने नमवत अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला.

फायनल राऊंडमध्ये दानिशला मध्य प्रदेशचा अभय दुगुर याच्या सोबत १६-१८, २२-२३ अशा गुण फरकाने पराभव पत्करावा लागून रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. दानिश रहेमान तडवी हा सरदारजी हायस्कूल रावेर तथा जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा खेळाडू असुन त्याला प्रशिक्षक जयेश बाविस्कर ( एन.आय.एस. डिप्लोमा ) यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले आहे. त्याच्या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, महासचिव अजित घारगे, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य सौरभ चौबे, महेश घारगे, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे सरदार जी हायस्कूलचे शिक्षकवृंद यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT