Antar Singh Arya image source - X
जळगाव

राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्या जळगाव दौऱ्यावर

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्या हे येत्या 12 व 13 सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

अंतरसिंग आर्या यांचा दौरा असा राहील...

  • दिनांक 12/09/2024 रोजी सकाळी सेंधवा (मध्यप्रदेश) येथून सकाळी 11.00 वा. जळगाव जिल्हयात येतील व दौऱ्यामध्ये प्रामुख्याने 'एक पेड माँ के नाम' या संकल्पनेतून वृक्षारोपण करणे, पेसा ग्रामपंचायत, आश्रम शाळांना भेट व वनहक्क समिती, वनहक्क प्राप्त लाभार्थी यांच्या सोबत चर्चा करतील व आदिवासी भागामध्ये पाहणी करतील.

  • दिनांक 13/09/2024 रोजी आदिवासी भागातील रस्ते, आरोग्यसुविधा, पाणीपुरवठा इत्यादी बाबतचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमासोबत चर्चा करणार असल्याची माहिती यावलच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT