Special train  file photo
जळगाव

Mahaparinirvan Special Trains: महापरिनिर्वाण दिनानिमित्त विदर्भ-खानदेशातून मुंबईसाठी धावणार मध्य रेल्वेच्या ११ विशेष गाड्या

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर अभिवादनासाठी जाणाऱ्या अनुयायांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Mahaparinirvan Special Trains

जळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर अभिवादनासाठी जाणाऱ्या अनुयायांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी नागपूर आणि अमरावती येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) दरम्यान एकूण ११ अनारक्षित विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. या सर्व गाड्यांना भुसावळ, जळगाव आणि चाळीसगाव स्थानकांवर थांबा देण्यात आल्याने खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

१) नागपूर ते मुंबई (सीएसएमटी) एकेरी विशेष गाड्या

गाडी क्र. ०१२६० : ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:१० वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०:५५ वाजता मुंबईला पोहोचेल.

गाडी क्र. ०१२६२ : ४ डिसेंबर रोजी रात्री ११:५५ वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ४:१५ वाजता मुंबईला पोहोचेल.

गाडी क्र. ०१२६४ : ५ डिसेंबर रोजी सकाळी ७:४० वाजता नागपूरहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११:५५ वाजता मुंबईला पोहोचेल.

गाडी क्र. ०१२६६ : ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:१० वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०:५५ वाजता मुंबईला पोहोचेल.

२) मुंबई (सीएसएमटी) ते नागपूर परतीच्या विशेष गाड्या

गाडी क्र. ०१२४९ : ६ डिसेंबर रोजी रात्री ८:२५ वाजता मुंबईहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११:२० वाजता नागपूरला पोहोचेल.

गाडी क्र. ०१२५३ : ७ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२:४० वाजता दादर येथून सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी ४:१० वाजता नागपूरला पोहोचेल.

गाडी क्र. ०१२५१ : ७ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता मुंबईहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२:५५ वाजता नागपूरला पोहोचेल.

गाडी क्र. ०१२५५ : ७ डिसेंबर रोजी दुपारी १२:३५ वाजता मुंबईहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३:०० वाजता नागपूरला पोहोचेल.

गाडी क्र. ०१२५७ : ८ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२:२५ वाजता मुंबईहून सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी ४:१० वाजता नागपूरला पोहोचेल.

प्रमुख थांबे : नागपूर-मुंबईदरम्यान धावणाऱ्या सर्व गाड्यांना अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर या स्थानकांवर थांबा असेल.

३) अमरावती-मुंबई विशेष गाड्या (पाचोरा स्थानकावरही थांबा)

गाडी क्र. ०१२१८ : ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:४५ वाजता अमरावतीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५:२५ वाजता मुंबईला पोहोचेल.

गाडी क्र. ०१२१७ : ७ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२:४० वाजता मुंबईहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२:५० वाजता अमरावतीला पोहोचेल.

थांबे : बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि दादर.

सर्व डबे अनारक्षित; वैध तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन

या सर्व विशेष गाड्यांना १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे (जनरल) डबे आणि २ गार्ड ब्रेक व्हॅन असतील. सविस्तर वेळापत्रकासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाचा किंवा NTES ॲपचा वापर करावा. प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT