जळगाव

Ashadhi Ekadashi | मध्य रेल्वेकडून आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरसाठी विशेष गाड्या

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : मध्य रेल्वेकडून आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी नागपूर–मिरज, नवी अमरावती–पंढरपूर, खामगाव–पंढरपूर आणि भुसावळ–पंढरपूर या मार्गांवर आषाढी एकादशी विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.

1) नागपूर–मिरज विशेष (4 फेऱ्या)

गाडी क्र. 01205 विशेष दिनांक 23.07.2026 आणि 24.07.2026 रोजी नागपूर येथून 08.50 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी मिरज येथे 11.55 वाजता पोहोचेल.

गाडी क्र. 01206 विशेष दिनांक 24.07.2026 आणि 25.07.2026 रोजी मिरज येथून 12.55 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी नागपूर येथे 12.25 वाजता पोहोचेल.

थांबे : अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड, कुर्डुवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसबा डोंगरगाव, जत रोड, ढाळगाव, कवठेमहांकाळ, सलगरे आणि आरग.

रचना : 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 10 शयनयान, 4 सामान्य द्वितीय श्रेणी तसेच 2 सामान-सह-गार्ड ब्रेकव्हॅन.

2) नवी अमरावती–पंढरपूर विशेष (4 फेऱ्या)

गाडी क्र. 01119 विशेष दिनांक 21.07.2026 आणि 24.07.2026 रोजी नवी अमरावती येथून 14.40 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी पंढरपूर येथे 09.10 वाजता पोहोचेल.

गाडी क्र. 01120 विशेष दिनांक 22.07.2026 आणि 25.07.2026 रोजी पंढरपूर येथून 19.30 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी नवी अमरावती येथे 12.50 वाजता पोहोचेल.

थांबे : बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जळंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी.

रचना : 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 10 शयनयान, 4 सामान्य द्वितीय श्रेणी तसेच 2 सामान-सह-गार्ड ब्रेकव्हॅन.

3) खामगाव–पंढरपूर विशेष (4 फेऱ्या)

गाडी क्र. 01121 विशेष दिनांक 21.07.2026 आणि 23.07.2026 रोजी खामगाव येथून 11.30 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी पंढरपूर येथे 03.30 वाजता पोहोचेल.

गाडी क्र. 01122 विशेष दिनांक 22.07.2026 आणि 24.07.2026 रोजी पंढरपूर येथून 05.00 वाजता सुटेल व त्याच दिवशी खामगाव येथे 19.30 वाजता पोहोचेल.

थांबे : जळंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी.

रचना : 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 10 शयनयान, 4 सामान्य द्वितीय श्रेणी तसेच 2 सामान-सह-गार्ड ब्रेकव्हॅन.

4) भुसावळ–पंढरपूर अनारक्षित विशेष (4 फेऱ्या)

गाडी क्र. 01159 विशेष दिनांक 24.07.2026 आणि 25.07.2026 रोजी भुसावळ येथून 13.30 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी पंढरपूर येथे 03.30 वाजता पोहोचेल.

गाडी क्र. 01160 विशेष दिनांक 25.07.2026 आणि 26.07.2026 रोजी पंढरपूर येथून 22.30 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी भुसावळ येथे 13.00 वाजता पोहोचेल.

थांबे : जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी.

रचना : 16 सामान्य द्वितीय श्रेणी डबे तसेच 2 सामान-सह-गार्ड ब्रेकव्हॅन.

सविस्तर वेळापत्रक व थांब्यांची माहिती जाणून घेण्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी किंवा NTES अॅप डाउनलोड करावे. असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT