central railway  file photo
जळगाव

Center Railway News | महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनारक्षित विशेष गाड्या

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनारक्षित विशेष गाड्या धावणार

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या धावणार आहेत.

नागपूर ते मुंबई एकेरी विशेष गाड्यांचे तपशील असे...

  • विशेष गाडी क्रमांक ०१२६२ दि. ४ डिसेंबर रोजी नागपुर येथून २३.५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १५.३० वाजता पोहोचेल.

  • विशेष गाडी क्रमांक ०१२६४ दि. ०५ डिसेंबर रोजी नागपुर येथून ०८.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी २३.२० वाजता पोहोचेल.

  • विशेष गाडी क्रमांक ०१२६६ दि. ०५ डिसेंबर रोजी नागपुर येथून १५.५० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १०.५५ वाजता पोहोचेल.

थांबे - अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगांव, धामणगांव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापुर, भुसावल, जलगांव, चाळिसगांव, मनमाड, नासिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर.

संरचना - दोन गार्ड ब्रेक व्हॅनसह १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे.

अतिरिक्त नागपूर ते मुंबई एकेरी विशेष

विशेष गाडी क्रमांक ०२०४० दि. ०७ डिसेंबर रोजी नागपुर येथून १३.२० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०४ डिसेंबर वाजता पोहोचेल.

थांबे - अजनी, वर्धा, पुलगांव, धामणगांव, बडनेरा, अकोला, शेगांव, मलकापुर, भुसावल, नासिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि दादर.

संरचना - दोन गार्ड ब्रेक व्हॅनसह १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर एकेरी विशेष गाड्यांचे तपशील असे...

विशेष गाडी क्रमांक ०१२४९ दि. ०६ डिसेंबर रोजी मुंबई येथून १६.४५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १०.०५ वाजता पोहोचेल.

विशेष गाडी क्रमांक ०१२५१ दि. ०६ डिसेंबर रोजी मुंबई येथून १८.३५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.१० वाजता पोहोचेल.

विशेष गाडी क्रमांक ०१२५३ दि. ०७ डिसेंबर रोजी दादर येथून ००.४० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल.

विशेष गाडी क्रमांक ०१२५५ दि. ०७ डिसेंबर रोजी मुंबई येथून १२.३५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०३.०० वाजता पोहोचेल.

विशेष गाडी क्रमांक ०१२५७ दि. ०८ डिसेंबर रोजी मुंबई येथून १८.३५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.१० वाजता पोहोचेल.

विशेष गाडी क्रमांक ०१२५९ दि. ०८ डिसेंबर रोजी दादर येथून ००.४० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल.

थांबे - दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगांव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगांव, पुलगांव, वर्धा, सेवाग्राम आणि अजनी.

संरचना - दोन गार्ड ब्रेक व्हॅनसह १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे.

विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा

सर्व संबंधितांना विनंती आहे कि कृपया या विशेष गाड्याची नोंद घावी आणि आपला प्रवास सुखकर करावा. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य तिकीट काढून प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT