जळगाव : भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील आयुध निर्माणी मध्ये तयार होणाऱ्या गोळ्यांच्या चाचणीसाठी वापरत असलेल्या तीन एके 47 सेवन व दोन अत्याधूनिक गलील रायफल्स कुणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे आयुध निर्माणीत खळबळ उडाली असून या प्रकरणी वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ तालुक्यामध्ये भुसावळ व वरणगाव या ठिकाणी आयुध निर्माणी अशा दोन ऑडिनन्स फॅक्टरी आहेत. त्यामध्ये वरणगाव आयुध निर्माण या ठिकाणी पोलीस व सेनादलासाठी लागणाऱ्या बंदुकीच्या गोळ्यांची निर्मिती करण्यात येते. यासाठी वरणगाव फॅक्टरी मध्ये कॉलिटी कंट्रोल रूम (प्रुफ टेस्टींग विभाग) चे शस्त्रागार आहे. या शस्त्रगारातून 19 ते 21 ऑक्टोबर दरम्यान चोरट्यांनी कुलूप तोडून त्यामधील तीन लाख रुपये किमतीच्या तीन एके 47 व पाच लाख रुपये किमतीच्या दोन गलील रायफल अज्ञात चोरट्याने लांबविल्या. हा प्रकार लक्षात आल्यानंतर वरिष्ठांना तातडीने माहिती देण्यात आली. आयुध निर्माणी प्रशासनाच्या अधिकार्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला मात्र गहाळ झालेल्या पाच रायफली कुठेही न आढळल्याने कनिष्ठ कार्यप्रबंधक प्रदीपकुमार बाबूराव चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार वरणगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे .
अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक राजकुमार शिंदे, घटनास्थळी भेट देत माहिती जाणून घेतली आहे.