जळगाव

Jalgaon crime news | भुसावळात 'गावठी कट्टा' नाचवणाऱ्या नाशिकच्या गबरुला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

श्रीराम नगर परिसरातून आरोपी जेरबंद, पिस्तुलसह जिवंत काडतूस जप्त

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : शहरात गुन्हेगारीच्या उद्देशाने गावठी पिस्तुल (कट्टा) घेऊन फिरणाऱ्या नाशिकच्या एका तरुणाला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचून जेरबंद केले. आरोपीकडून २० हजार रुपये किमतीचे मॅगझीनसह पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले असून, पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्याने गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक . महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध मोहीम उघडण्याचे आदेश दिले आहेत. याच दरम्यान, भुसावळच्या श्रीराम नगर भागात श्रीराम मंदिराजवळ एक तरुण संशयास्पदरीत्या फिरत असून, त्याच्याकडे गावठी कट्टा असल्याची गुप्त माहिती बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळाली. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ डी.बी. पथकाला कारवाईचे आदेश दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, डी.बी. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रीराम नगर परिसरात सापळा रचून. आरोपी संदीप सुनील जाधव (वय २३, रा. रा.कुमावत नगर, सहजयश अपार्टमेंट, मखमलाबाद रोड, पंचवटी, नाशिक. ) याला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्या कमरेला खोचलेले २० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तुल आणि खिशात जिवंत काडतूस आढळून आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पीएसआय राजू सांगळे, भारती काळे, विजय नेरकर, कांतीलाल केदारे, भूषण चौधरी, अमर अडाळे, योगेश माळी, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, प्रशांत सोनार, जीवन कापडे, दिलीप कोल्हे, चंद्रकांत रायपूरकर, जावेद शहा आणि हर्षल महाजन यांच्या पथकाने केली.

याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १६२/२०२६ नुसार आर्म ॲक्ट ३/२५ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर करत आहेत. नाशिकचा हा तरुण भुसावळात कोणत्या मोठ्या गुन्ह्याच्या बेतात होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT