Bangladeshi woman detained Jalgaon Pudhari
जळगाव

Jalgaon Crime | जळगावात बेकायदेशीर वास्तव्य करणारी बांगलादेशी तरुणी ताब्यात; आश्रय देणाऱ्यावरही गुन्हा

बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या एका बांगलादेशी तरुणीला शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले

पुढारी वृत्तसेवा

Bangladeshi woman detained Jalgaon

जळगाव : शहरात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या एका बांगलादेशी तरुणीला शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिला आश्रय देणाऱ्या व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील परदेशी नागरिकांच्या अनधिकृत वास्तव्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष शोध मोहिमेदरम्यान शनिपेठ पोलिसांना जोशी पेठ परिसरातील भोई गल्ली येथे एक परदेशी महिला संशयास्पदरीत्या राहत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी १० मे २०२६ रोजी संबंधित ठिकाणी छापा टाकला.

कारवाईदरम्यान कोनिका राणी शामलचंद्र राय (वय २०, मूळ रा. बांगलादेश) हिला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत तिच्याकडे भारतात वास्तव्य करण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेही वैध पासपोर्ट, व्हिसा किंवा नागरिकत्वासंदर्भातील कागदपत्र नसल्याचे समोर आले. ती काही दिवसांपासून जळगावात राहत असल्याची माहितीही तपासात उघड झाली आहे.

दरम्यान, या तरुणीला आश्रय दिल्याप्रकरणी चिन्मय जगन्नाथ वाला (मूळ रा. पश्चिम बंगाल, सध्या रा. जळगाव) याच्याविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित महिला बांगलादेशातून बेकायदेशीररीत्या भारतात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, पुढील तपास शनिपेठ पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT