जळगाव | जैन इरिगेशन सिस्टिम्स ली चे उपाध्यक्ष अनिल जैन यांना डॉ. डी. वाय. पाटील कृषी व तांत्रिक विद्यापीठ, कोल्हापूर ने डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी जाहीर केली आहे.
शेती व त्यातील शाश्वत विकासातील सातत्य व महत्वपूर्ण योगदानाबद्दल जैन यांना डॉ. डी. वाय. पाटील कृषी व तांत्रिक विद्यापीठ , कोल्हापूर ने डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी जाहीर केली आहे. सोमवारी होणाऱ्या विद्यापीठाच्या पहिल्या पदवीदान समारंभात जैन यांना ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे..