Deputy Chief Minister Ajit Pawar
Deputy Chief Minister Ajit Pawar file photo
जळगाव

Ajit Pawar | बहिणीला त्यांच्या भावाची ओवाळणी मिळणार

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : लाडक्या बहिणीसाठी तीन सिलेंडर मोफत तसेच इतरही सरकारी योजना या आगामी निवडणुकीला डोळ्या समोर ठेवून आणलेल्या नाहीत. त्यामुळे विरोधक काय बोलतात आणि त्यांच्या टिकाटिप्पणीचे मला काही देणे घेणे नाही, असे असे स्पष्ट वक्तव्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना टोला लगावला.

जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर जिल्हा प्रशासनातर्फे मंगळवारी महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रारंभ करण्यात आला. यानिमित्त आयोजित मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या कार्यक्रमात माय माऊली प्रचंड संख्येने उपस्थित आहेत. राज्य सरकार व माझ्या वतीने मी त्यांचे स्वागत करतो आमच्या सरकारने गोरगरिब, महिला आणि शेतकरी यांचा विचार करुनच सरकारी योजना आणल्या आहेत. निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन या योजना आणलेल्या नसल्याने विरोधकांचे काही देणे घेणे नाही, असे पवार यावेळी म्हणाले.

मला माहितीे आहे की, माझ्या लाडक्या बहिणींना ऑनलाइन फॉर्म भरण्यात विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याचा प्राधन्याने विचार करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजेनेसाठीच्या नारी शक्ती दूत ॲपमध्ये वेळोवेळी दुरस्ती करण्यात येत आहेत. प्रत्येक बहिणीला त्यांच्या भावाची ओवाळणीचे पैसे मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी दाखविल्याने उपस्थित महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

SCROLL FOR NEXT